Somy Ali allegations Salman Khan – बॉलीवूड मध्ये 90 च्या दशकात एक अप्रतिम सुंदर अशी प्रेम कहाणी रंगली होती. ही कहानी होती आपल्या बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान आणि अभिनेत्री सोमी अली यांची. परंतु हे नातं फार काळ टिकलं नाही. बॉलीवूडचा दबंग स्टार आणि भाईजान सलमान खान याचं खाजगी आयुष्य प्रचंड चर्चेत असतं. कधी काही वादाच्या भोवऱ्यात तर कधी अनेक जुन्या नात्यांमुळे सलमान खान कायम वादात सापडलेला दिसतो. असंच आता देखील सलमान खान एका जुन्या नात्यामुळे वादात सापडला आहे. दशक उलटले परंतु परत एकदा सोमी अली आणि सलमान खान यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे. याचं कारण आहे सोमी अलीने सलमान खान वर नुकतेच केलेले काही गंभीर आरोप.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून रागावलेली सोमी अली सलमान खानवर गंभीर आरोप करत असल्याचे दिसून येत आहे. तिने हा दावा केला आहे की सलमान खानने तिला एका अनोळखी नंबर वरून फोन कॉल केला. आणि जर तू माझ्याविरुद्ध काही बोललीस तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. एवढंच नाही तर आपल्याला बॉलीवूड मधून बॉय कट करण्याचा कट रचल्याचा आरोप देखील सोमी अलीने सलमान खान वर लगावलाय.
सोमी अली ने लगावले सलमान खान वर आरोप
सलमान खान माझ्या आयुष्यातून गेल्यानंतर सुद्धा मला एकटा सोडत नाही. तो 2025 मध्ये ही मला धमकावत आहे. माझा एक्स बॉयफ्रेंड असलेला सलमान मला एका अनोळखी नंबर वरून फोन करतो आणि मला म्हणतो, जर तू माझ्या विरुद्ध काही बोललीस तर मी काय करू शकतो ते तुला कळेलच. आणि तो तसं वागला देखील. त्याने मला बॉलीवूड मधून बॉलकोट केलं. त्यामुळे बॉलीवूड मधील कोणीच माझ्याशी संवाद साधत नाही. माझे मित्र देखील माझ्यापासून दूर पळतात. असा आरोप सोमी अली ने लगावला आहे.
माझी फसवणूक केली
सलमान खानने टीआरपी त्याचे रेटिंग आणि सगळं काही गमावलं आहे. आणि माझ्या आयुष्यात नसला तरी तो माझा पाठलाग सोडत नाही. तो मला बुली करतो. 1998 मध्ये त्याने माझी फसवणूक केली म्हणून मी त्याच्याशी ब्रेकअप केलं. परंतु आता 2025 मध्ये दुबईला जाऊन माझ्या कुटुंबीयांना देखील तो भेटतो. कारण त्याला माझी काळजी आहे असं नाही तर त्याला मला दुखवायची इच्छा आहे असेही आरोप तिने सलमान खान वर केलेत.
View this post on Instagram
कोन आहे सोमी अली
सोमी अली ही पाकिस्तान मधून मुंबईत आली होती. तेव्हा ती फक्त 16 ते 17 वर्षाची होती. तिचे मुंबईत येण्यामागचे उद्दिष्टे होते बॉलीवूडमध्ये नाव कमवायचं. तिला सलमान खान प्रचंड आवडत होता. ती म्हणायची की बॉलीवूडमध्ये येण्याचे एकमेव कारण म्हणजे सलमान खान. आणि बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सलमान खान आणि सोमी अली यांचं नातं फुलले. बऱ्याचदा ते एकत्र देखील दिसायचे. दोघेही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र झळकलेत. परंतु काही काळानंतर त्यांच्यात मतभेद झाले, अनेक गैरसमज अफवा पसरल्या. आणि सलमान खानच्या आयुष्यात इतर महिलांची एन्ट्री झाल्याने हे नातं संपुष्टात आलं.
सलमानने तिच्याशी हिंसक वर्तन केले
गेल्या काही वर्षांपासून सोमी अली अभिनेता सलमान खानवर गंभीर आरोप करते. आजही ती सलमान खानवर गंभीर आरोप लगावते. यापूर्वी तिने सलमान खानवर एक आरोप लगावला होता तो म्हणजे, सलमानने तिच्याशी हिंसक वर्तन केले आणि तिला मानसिक त्रास दिला. तिच्या आत्मसन्मानावर घाव घातला. बरेचदा तिने instagram वर सलमानचा उल्लेख करून मी जे अनुभवले ते विसरणे शक्य नाही असं सांगितलं. परंतु सलमान खानचे फॅन्स आणि बॉलीवूड स्टार्स म्हणतात की जुने विषय पुन्हा उकळून काढू नका. आणि दुर्लक्ष करतात.
ती सध्या काय करते (Somy Ali allegations Salman Khan)
सोमी अली सध्या अमेरिकेत no more tear या समाजसेवी संस्थेचे नेतृत्व करते. ही संस्था घरगुती हिंसा अत्याचार आणि लैंगिक शोषण भोगलेल्या महिलांना मदत करत असते. मी ज्या अनुभवलेला आहे ते इतर महिलांनाही होऊ देऊ शकत नाही म्हणूनच मी माझा आयुष्य समाज सेवेला अर्पण केलं असं तुम्ही आली म्हणते. परंतु या आरोप प्रत्यारोपण मागे कोण किती खरं आणि खोटं हे काळच ठरवू शकतं. तू एक गोष्ट निश्चित किया नात्याने बॉलीवूडला एक गाजलेली आणि कडू आठवण करून दिली.
अभिनेत्री सोमी अली ही 90 च्या दशकात अंत, यार, गद्दार, आओ प्यार करे यासारखा चित्रपटांमध्ये काम केले होते. तिचा फिल्मी करिअर जरी लहान असले तरी तिच्या ऑन स्क्रीन उपस्थितीने आणि ऑफ स्क्रीन चर्चांनी ती कायम लोकांच्या लक्षात राहिलेली आहे. सोमी अलीने केलेले सलमान खान वरील आरोपांवर सलमान खान यांनी कधीच थेट भाष्य केलेले नाही. तर सलमान खानचे चाहते देखील या गंभीर आरोपांना इग्नोर करताना दिसतात.












