Under 19 World Cup schedule : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जानेवारी फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या आयसीसी अंडर १८ मेन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आहे आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार असून त्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना असते. मात्र, आयसीसीने घेतलेल्या एका आश्चर्यकारक निर्णयामुळे आता ही संधी मावळली आहे. कारण आयसीसीने गेल्या काही वर्षांपासून सुरु बदलांमुळे काही अंशी या शमवल्याचं दिसत आहे. आयसीसीने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही गटांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागलं आहे. त्यामुळे साखळी फेरीत हे दोन्ही संघ एकमेकांना भिडणार नाहीत. मात्र, बाद फेरीत दोन्ही संघ एकमेकांना भिडू शकतात.
View this post on Instagram
वनडे फॉर्मेटमध्ये खेळल्या जाणारी ही स्पर्धा 15 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर 6 फेब्रुवारीला अंतिम सामना असणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ असून चार गटात विभागणी केली आहे. यात सर्वाधिक पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलेल्या भारतीय संघाला अ गटात ठेवलं आहे. या गटात भारतासोबत न्यूझीलंड, बांग्लादेश आणि अमेरिका आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे. हा सामना झिम्बाब्वेच्या बुलावायोत होईल.
हेही वाचा – बीसीसीआयने शुभमन गिल बाबत दिली महत्त्वाची अपडेट! “तो संघासोबत गुवाहाटीला जाईल, पण…”
ही स्पर्धा पुढच्या पिढीतील आयकॉननाही समोर आणते; जय शहा
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी सांगितलं की, या स्पर्धेची उत्सुकता आहे. यात जागतिक क्रिकेटमधील भविष्यातील तारे दिसतील. “आयसीसी अंडर 19 मेन्स क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही केवळ पुढच्या पिढीतील क्रिकेटपटूंनाच नव्हे तर पुढच्या पिढीतील आयकॉननाही समोर आणते. ब्रायन लारा आणि सनथ जयसूर्यापासून ते विराट कोहली, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ आणि शुबमन गिलपर्यंत, या स्पर्धेने आपल्या खेळाचे भविष्य सातत्याने घडवले आहे.”
या स्पर्धेत एकूण 16 संघ असून चार गटात विभागणी
गट अ मध्ये भारत, बांगलादेश, अमेरिका आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. गट ब मध्ये सह-यजमान झिम्बाब्वे, पाकिस्तान, इंग्लंड आणि स्कॉटलंड आहेत. गट क मध्ये गतविजेता ऑस्ट्रेलिया , आयर्लंड, जपान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. गट ड मध्ये टांझानिया, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.





