• Home
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्रात येणार थंडीची लाट; काही दिवसात थंडीचा काडाखा आणखीन वाढण्याची शक्यता
Pune

महाराष्ट्रात येणार थंडीची लाट; काही दिवसात थंडीचा काडाखा आणखीन वाढण्याची शक्यता

Cold wave expected in Maharashtra with temperature likely to drop further

Cold wave in Maharashtra : महाराष्ट्रात थंडीचा कडाका प्रचंड वाढत आहे. आज राज्याती तापमानात घट कायम राहणार असून बऱ्याच भागात कोरडे आणि शुद्ध वातावरण राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. बऱ्याच दिवसांपासून उत्तर भागातील थंडी वाढत असून पारा सातत्याने घसरत असल्याचे दिसत आहे. तर या दिशेने थंड वाऱ्याचा प्रवाह येत असल्याने गारठा कायम असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे काही दिवसात उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यात थंडी अजून मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्रात थंडीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय देशाच्या तीन राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील वर्तवण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील संपूर्ण वातावरण बदलल्याचे पाहायला मिळाले तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने धूम केली होती. आता नागरिकांना हिवाळा ऐवजी पावसाळा काय राहतो कि काय अशी भीती जाणवत होती. परंतु आता थंडीच्या तापमानाचा पॅरा वाढताना पाहता कडक वाढल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 6.1 अंश सेल्सयस एवढे आहे. हे तापमान दिवसेंदिवस खाली येत असून थंडीच्या कडाक्यामुळे पालकांकडून शाळेच्या वेळेत बदल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. याशिवाय पुण्यात देखील थंडीचा कडक वाढल्याचे दिसून येत आहे. तर आज मुंबई शहरात आजचे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस असणार आहे. याशिवाय मुंबई आणि उपनगरात आणखी थंडी वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts