Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • धर्मेंद्र यांच्या मालमत्तेचे होणार किती हिस्से; कोण होणार वारसदार
मनोरंजन

धर्मेंद्र यांच्या मालमत्तेचे होणार किती हिस्से; कोण होणार वारसदार

Dharmendra pictured with Hema Malini, Sunny Deol, Bobby Deol, Ahana Deol, and Esha Deol together in a family photo collage

Dharmendra property heirs : 90 च्या दशकात बॉलिवूड चित्रपटसृष्टी गाजवणारा अभिनेता तथा ही-मॅन म्हणून ओळखल्या जाणारे अभिनेते धर्मेंद्र यांनी 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सन 1935ते 2025 च्या कार्यकाळात त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांनी 275 चित्रपटातून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाने मोहोळ घातली. सध्या त्यांच्या कोट्यवधींच्या प्रॉपर्टीचे वारसदार कोण होणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अभिनेता धर्मेंद्र यांनी 2 लग्न केली होती त्यातून त्यांना 6 अपत्ये आहेत. आता त्यांच्या संपत्तीचा वारसदार नेमक होणार तरी कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

किती आहे धर्मेंद्र यांची मालमत्ता

अभिनेता धर्मेंद्र यांच्या यशस्वी अभिनय कारकिर्दीतून आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या स्थावर मालमत्ता (Real Estate Portfolio) या सर्वांचा विचार करून त्यांच्याकडे 335 ते 450 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
हा आकडा ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. त्यांच्या मालमत्तेत 100 एकरचा फार्म हाऊस चा मोठा वाटा आहे. एवढेच नाही तर त्यांच्या विजयता फिल्म आणि गरम धरम ढाबा या रेस्ट्रॉरंट मधून देखील मोठी कमाई होते. त्यातून त्यांनी मोठी संपत्ती कमावली आहे.

हे ही वाचा : अभिनेता धर्मेंद्र यांना होता हा त्रास; यापूर्वी देखील होते रुग्णालयात दाखल

काय सांगतो कायदा

वारस हक्कासाठी हिंदू धर्मात कायद्याचा प्रभाव पाहायला मिळतो. त्यानुषंगाने आता वारसदार कोण ठरणारे हे ठरवण्यात येणार आहे. धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर पहिली पत्नी जिवंत असताना देखील घटस्पोट न घेता त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरा विवाह केला होता. परंतु पहिली पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह करणे हे हिंदू विवाह कायदा अंतर्गत ‘अवैध’ असल्याचे मानले जाते. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या संपत्तीत दुसऱ्या पत्नीचा अधिकार आहे का यावर चर्चा सुरू आहे.

कोण होणार वारसदार

प्रकाश कौर यांचे अपत्या सनी देओल, बॉबी देओल, अजिता आणि विजेता देओल यांना धर्मेंद्र यांच्या स्व अर्जित मालमत्तेवर संपूर्ण आणि सामान हक्क असेल. परंतु त्यांना वडिलोपार्जित संपत्तीवर थेट अधिकार मिळणार नाही. तर धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांची अपत्ये ईशा आणि अहाना देओल यांना वडिलांच्या स्व-अर्जित मालमत्तेसोबतच वडिलोपार्जित संपत्तीवर देखील हक्क मिळेल. याला कायदेशीर भाषेत ‘नोशनल पार्टिशन’ (Notional Partition) म्हणतात.
म्हणजेच वडिलोपार्जित मालमत्तेत धर्मेंद्र यांच्या वाट्याला आलेला हिस्सा त्यांच्या सर्व वारसांमध्ये म्हणजेच 6 अपत्यांमध्ये समान वाटण्यात येणार आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts