इमरान यांच्या कुटुंबियांना गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांना भेटू दिले जात नाही अशा वातावरणात हत्या झाल्याची बातमी आली आहे. त्यांच्या बहिणी अलीमा, उज्मा आणि नोरिन यांनी वारंवार अदियाला तुरुंगात जाण्याचा प्रयत्न केला. परंतू प्रत्येक वेळी त्यांना गेटवरच अडवण्यात आलं. इमरान यांच्या संदर्भात इतके संशयाचे वातावरण आहे की इमरान समर्थक जेलच्या बाहेर जोरदार निदर्शने करत आहेत. सरकार काही सांगत नाहीए, ना जेल प्रशासन, तसचं दोन आठवड्यांपासून इमरान खान यांचे कोणतेही अधिकृत छायाचित्र जारी करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे इमरान यांची हत्या झाल्याच्या शंकेला अधिक वाव मिळाला आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातच हत्या झाल्याचा दावा अफगान प्रसारमाध्यमांनी केला आहे. मात्र, या बातमीची पाकिस्तानकडून अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही. गिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स बलुचीस्तान नावाच्या ‘एक्स’ खात्यावर इम्रान खान यांच्या हत्येचा दावा करण्यात आलाय. त्यानुसार ५ अशा गोष्टींची माहिती घेऊ, ज्यामुळं इमरान खान यांच्या हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा – माजी पंतप्रधान इमरान खानची जेलमध्ये हत्या! पाकिस्तानात अफवांचं पेव
१. कुटुंबाला देखील भेटू दिले जात नाही
इमरान खान यांच्या बहिणी अलीमा खान, नूरीन खान आणि उझमा खान यांना वारंवार गेटवर अडवले जात आहे. 25 नोव्हेंबरच्या रात्री तिन्ही बहिणींनी जेलच्या बाहेर शेकडो समर्थकांसह निदर्शने केली. त्यांचा आरोप आहे की इमरान यांच्यासंदर्भात काहीतरी वाईट झाले आहे. इमरानची बहिण नुरीन खान हीने पंजाब पोलिसांना संघटीत हल्ला करण्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की कोणतीही सूचना न देता स्ट्रीट लाईट बंद केली आणि पोलिसांनी आमच्यावर हल्ला केला.
२. डॉक्टरांना भेटू दिले जात नाही
मार्च 2025 मध्ये PIMS हॉस्पिटलच्या मेडीकल टीमने त्यांची तपासणी केली होती. परंतू PTI या त्यांच्या पक्षाने हे मेडीकल चेकअप केवळ देखावा होता असे म्हटले आहे. त्यानंतर कोणत्याही विश्वासार्ह डॉक्टरांनी त्यांची तपासणी करु दिली नाही. मात्र, कोर्टाने स्पष्ट आदेश दिले होते, त्यांना आठवड्यातून दोनदा कुटुंबाला भेटू द्यावे, वकील आणि मित्रांना भेटू द्यावे. त्यांच्या स्थितीवरुन अनेक गंभीर प्रश्न निर्माण केल जात आहेत.
३. वकीलांना देखील भेटू दिले नाही
इस्लामाबाद हायकोर्टाने मार्चमध्ये आदेश दिले होते की इमरान यांना त्यांच्या वकीलांना भेटू दिले जावे. परंतू गेल्या महिन्यांपासून वकीलांचा प्रवेश पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे इमरान यांचा पक्ष PTI ने केलेल्या आरोपात तथ्य वाटत आहे की इमरान यांची स्थिती लपवली जात आहे.४. जनरल मुनीर यांची अचानक आपात्कालीन बैठक
इमरान खान यांच्या रहस्यमय स्थितीमुळे पाकिस्तानचे सैन्याचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अचानक एक उच्च स्तरिय आपात्कालिन सुरक्षा बैठक बोलावली आहे. या बैठकीत आयएसआय, मिलिट्री इंटेलिजन्स आणि गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीचा एजेंडा सार्वजनिक केला गेलेला नाही. त्यामुळे असा कयास केला जात आहे की पाकिस्तानचे सरकार आणि सैन्य यांच्या काहीतरी मोठा डाव होणार असल्याचे म्हटले जात आहे.
५. दोन आठवड्यांपासून इमरान यांचा ठावठिकाणा नाही
इमरान खान यांना एकतर कोणत्यातरी गुप्त ठिकाणी हलवले आहे किंवा त्यांना नजरकैदेत एकांतवासात डांबले आहे असा दावा पीटीआयच्या नेत्यांनी केला आहे. गेल्या दोन वर्षात त्यांचे तुरुंगातील अधिकृत फोटो आणि अपडेट मिळत होते. परंतू असे पहिल्यांदाच झाले आहे की गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांची कोणतीही माहिती बाहेर आलेली नसल्याने संशय वाढला आहे.












