Hong Kong high-rise fire 94 dead : हाँगकाँगच्या ताईपेई जिल्ह्यातील एका गृहनिर्माण संकुलात बुधवारी, 26 नोव्हेंबर रोजी लागलेल्या आगीत मृतांचा आकडा वाढतच आहे. ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत अंदाजे 94 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सीएनएननं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ही घटना दशकांमधील सर्वात भीषण आपत्तींपैकी एक असल्याचं मानलं जातयं. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असलं तरी, 200 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. संपूर्ण ३२ मजली अपार्टमेंट इमारत राखेत जळून खाक झाली आहे.अनेकांची प्रकृती गंभीर :
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या मते, जखमींपैकी 43 जणांची प्रकृती गंभीर आहे. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुरुवारी, हाँगकाँग पोलिसांनी “घोर निष्काळजीपणा” च्या संशयावरून नूतनीकरण प्रकल्पात सहभागी असलेल्या तीन जणांना अटक केली.
Hong Kong authorities said on Friday the death toll from the city’s worst fire in decades had risen to at least 94, with the blaze almost entirely extinguished and rescuers scouring torched high-rise buildings for scores of people still listed as missing. https://t.co/1RwXrMUnFW pic.twitter.com/AcMHggvd85
— AFP News Agency (@AFP) November 27, 2025
आठपैकी सात ब्लॉक प्रभावित :
सीएनएनच्या मते, अधिकाऱ्यांनी सांगितलं की प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की पॉलिस्टीरिन बोर्ड आणि जाळी आणि कॅनव्हाससारखे इतर बांधकाम साहित्य सुरक्षा मानकांची पूर्तता करत नव्हते. अग्निशमन सेवा संचालक अँडी येउंग म्हणाले की, हे पॉलिस्टीरिन बोर्ड अत्यंत ज्वलनशील आहेत, म्हणूनच आग इतक्या लवकर पसरली. आग इतकी भीषण होती की आपत्कालीन कर्मचारी पोहोचेपर्यंत इमारत पूर्णपणे वेढली गेली होती आणि एका टॉवरवरुन दुसऱ्या टॉवरपर्यंत पसरली होती. ही घटना अनेक इमारतींसाठी एक मोठी आपत्ती ठरली, ज्यामुळं आठपैकी किमान सात ब्लॉक प्रभावित झाले.
हे ही वाचा : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 21 वर्षांची शिक्षा; भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सुनावली शिक्षा
आग विझवण्यासाठी 128 अग्निशमन गाड्या :
आग विझविण्यासाठी 128 अग्निशमन गाड्या आणि 57 रुग्णवाहिकांच्या मदतीनं 800 हून अधिक अग्निशमन दल तैनात करण्यात आले. 37 वर्षीय अग्निशमन दलाचे जवान, हो वाई-हो, आग विझवण्याचा प्रयत्न करताना झालेल्या दुखापतींमुळं मरण पावले. हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन ली म्हणाले की, इमारतींमधील बहुतेक आगी गुरुवारी संध्याकाळपर्यंत “मोठ्या प्रमाणात नियंत्रणात” आल्या होत्या, परंतु नुकसानीचं प्रमाण अद्याप स्पष्ट नाही. आग पसरताच जवळच्या टॉवर्सना लवकर का बाहेर काढण्यात आलं नाही याचाही अधिकारी तपास करत आहेत. आधीच घरांच्या तीव्र कमतरतेचा सामना करणाऱ्या शहरात शेकडो लोक बेघर झाले आहेत. सरकारनं तात्पुरते निवारा उघडले आहेत आणि बाधित कुटुंबांना मदत करण्यासाठी “प्रति घर एक सामाजिक कार्यकर्ता” धोरण जाहीर केलं आहे.












