Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • बिग बॉस मराठी 5 विजेता सूरज चव्हाण अडकला लग्नबंधनात; पत्रिका देऊनही अनेकांनी फिरवली पाठ
मनोरंजन

बिग बॉस मराठी 5 विजेता सूरज चव्हाण अडकला लग्नबंधनात; पत्रिका देऊनही अनेकांनी फिरवली पाठ

Suraj Chavan wedding : मराठी बिग बॉस 5 चा विजेता ठरलेला साधा, मराठमोळा, भोळ्या स्वभावाचा सुरज चव्हाण आता चर्चेत आला आहे. त्याच्या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याचे लग्न. त्याचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. त्याच्या लग्नात त्याने अनेक अभिनेता अभिनेत्रींना पत्रिका दिली होती. परंतु अनेक दिग्ग कलाकारांनी त्याच्या लग्नाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.

टिकटॉक वर रिल्सच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेला रिल्सस्टार सुरज चव्हाण हा बिगबॉस मराठी 5 चा विजेता ठरल्या नंतर सतत चर्चेत राहिला आहे. कधी तो त्याच्या रिल्सने तर कधी त्याच्या भोळ्या स्वभावाने चर्चेत राहतो. काही दिवसांपासून त्याच्या विवाहाबद्दल चर्चा सुरु होत्या. आता त्याचा 29 नोव्हेंबर रोजी सासवड येथे धुमधडाक्यात विवाह सोहळा पार पडला असून त्याच्या नवीन प्रवासाला चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

सुरज चव्हाण ने विवाह सोहळ्यासाठी अनेकांना पत्रिका दिली होती. परंतु बरेच जवळचे व्यक्ती लग्नात सहभागी झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याने चुलत मामाची मुलगी संजना गोफणे हिच्याशी अरेंज मॅरेज केले होते. सोशल मीडियावर त्याच्या लग्नासोबतच हळदीचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोस पेक्षा त्याच्या लग्नाची पत्रिका खास चर्चेचा विषय बनली होती. कारण त्यामध्ये अनेक जणांची भरमसाठ नवे टाकण्यात आली होती. परंतु त्याच्या लग्नाला कोणीही आले नसल्याची माहिती मिळाली आहे.

हे ही वाचा : सिद्धार्थ कियाराने केले आपल्या मुलीचे नाव रिवील; जाणून घ्या काय आहे नावाचा अर्थ

यांनी लावली नाही लग्नात उपस्थिती

बिग बॉस 5 च्या घरात सुरज चव्हाण आणि अंकिता वालावलकर यांची भेट झाल्यापासून अंकिता सूरजला भाऊ मानते. तेव्हापासून ते दोघेही संपर्कात आहे. काही महिन्यांपूर्वी अंकिताने सुरज आणि संजनाचे केळवण केल्याची माहिती समोर आली होती. एशिअवय अंकिता सुरजच्या लग्नाची शॉपिंग करताना देखील दिसली होती. परंतु ती सुरजच्या लग्नात दिसली नाही. एवढेच नाही तर बिगबॉस मराठी 5 च्या सेटवर रितेश देशमुख आणि सुरज चव्हाण यांचे घट्ट नाते पाहायला मिळाले होते. परंतु त्यांनी देखील सुरज चव्हाणच्या लग्नाला उपस्थिती लावली नाही. तर अजितदादा पवार यांचे नाव पत्रिकेत टाकूनही त्यांनी बीड दौऱ्यामुळे लग्नाला येणे टाळले.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts