Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • व्ही शांताराम यांचे वैभवशाली जीवन आता मोठ्या पडद्यावर दिसणार; चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज
मनोरंजन

व्ही शांताराम यांचे वैभवशाली जीवन आता मोठ्या पडद्यावर दिसणार; चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज

First poster of the V Shantaram biopic showcasing the legendary filmmaker’s life and cinematic journey

V Shantaram biopic poster : भारतीय चित्रपट सृष्टीतील नावाजलेले व्यक्तिमत्व, भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिले गेमचेंजर व्ही. शांताराम यांचा प्रवास आता रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. त्यांच्यावर बनवण्यात येणाऱ्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. एवढेच नाही तर त्यांच्या या बायोपिकचे पहिले पोस्टर देखील नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.

दिग्दर्शक होण्यापर्यंतचा प्रवास या महाकाव्यातून उलगडणार

व्ही. शांताराम राजाराम वणकुंद्रे म्हणजे आपल्या चित्रपटसृष्टीला दिशा देणारे व्ही. शांताराम यांनी चित्रपटसृष्टीला नवीन उमेद, नवीन तत्वज्ञान, नवी सौन्दर्यभाषा दिली आहे. त्यांचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. त्यांच्यावर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले असून त्यांच्या दिग्दर्शक होण्यापर्यंतचा प्रवास या महाकाव्यातून उलगडणार आहे.

हे ही वाचा : बिग बॉस मराठी 5 विजेता सूरज चव्हाण अडकला लग्नबंधनात; पत्रिका देऊनही अनेकांनी फिरवली पाठ

व्ही शांताराम हे प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, नट आणि पटकथा लेख होते. त्यांनी प्रभात फिल्म कंपनी आणि राजकमल कलामंदिर या कंपन्या स्थापन केल्या होत्या. तर दो आँखे बारह हाथ, नवरंग यासारखे अनेक नावाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य संघर्ष, सर्जनशील ध्यास आणि जीवनात बदल घडवण्याच्या इच्छाशक्तीची प्रेरणादायी परंपरा तेवत ठेवली. या संपूर्ण प्रेरणादायी असा जीवन प्रवास आपण मोठ्या पडद्यावर लवकरच अनुभवणार आहोत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Camera Take Films (@cameratakefilms)

पहिली झलक आली समोर

या महाकाव्याचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले. या पोस्टर मध्ये सिद्धार्थ चतुर्वेदी व्ही शांताराम यांच्या भूमिकेत दिसत आहे. सिद्धार्थ चतुर्वेदी याची ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील गेम चेंजर ठरेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन लेखन अभिजीत शिरीष देशपांडे करत आहेत. अभिजित देशपांडे यांनी यापूर्वी डॉ. काशिनाथ घाणेकर या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. आता या चित्रपटाच्या यशानंतर व्ही शांताराम चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ही आजोबांच्या कर्तृत्वाला वाहिलेली एक भव्य श्रद्धांजली

या चित्रपटाची निर्मिती व्ही शांताराम यांचे नातू राहुल किरण शांताराम यांनी केली असून “हा चित्रपट म्हणजे माझ्यासाठी केवळ प्रोजेक्ट नाही तर ती एक भावना आहे. असे वक्तव्य त्यांनी केले आहे. ते पुढे म्हणतात कि, हा चित्रपट म्हणजे आमच्या सर्वांकडून आजोबांच्या कर्तृत्वाला वाहिलेली एक भव्य श्रद्धांजली आहे. व्ही. शांताराम यांनी भारतीय चित्रपटाला दिलेले योगदान आजच्या नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, हा आमच्या निर्मितीमागचा मुख्य उद्देश असल्याचंही शांताराम यांचे नातू राहुल किरण शांताराम यांनी सांगितले आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts