Beetroot face pack benefits : महिला त्यांच्या स्क्रीनला घेऊन अत्यंत भावनिक असतात. आजकाल मार्केट मध्ये विविध ब्रँडचे सौन्दर्य प्रसाधने मिळतात. हे सौन्दर्य प्रसाधने केमिकल युक्त असल्याने बऱ्याचदा स्क्रीनवर रॅशेस येतात तर बऱ्याच जणींना ते सूट देखील होत नाही. अशावेळी आयुर्वेदिक किंवा होम रेमेडीला जास्त प्राधान्य दिले जाते.
चेहऱ्याची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रभाव कायम ठेवण्यासाठी बीटरूट अत्यंत फायदेशीर आहे. बिट चा जांभळट रंग, गोड असा रस, पोषक तत्वांनी भरलेलं व्हिटॅमिन जे कि प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आणि सौन्दर्यासाठी फायदेशीर आहे. सध्या सोशल मीडियावर बीटरूटचा फेसपॅक अंत्यत व्हायरल होत असून अनेकांना असा प्रश्न पडत आहे कि, खरंच बीटरूट चा फेसपॅक कसा फायदेशीर असेल. तेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
या कारणाने आहे फायदेशीर
बीटरूट हे एक नैसर्गिक ग्लो बूस्टर आहे. या बीटरूटमध्ये व्हिटॅमिन C , अँटीऑक्सीडेन्ट, बीटालाईन्स, नैसर्गिक रंग मुबलक प्रमाणात असतात. हेच घटक सौन्दर्यासाठी आतून आणि बाहेरून महत्वपूर्ण असतात. हे घटक त्वचेची दाहकता कमी करण्यासाठी रक्ताभिसर सुधारण्यासाठी, त्वचेचा नॅचरल टोन उजळवण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे चेहऱ्यावर एक गुलाबी असा रंग येतो. आणि चेहऱ्यावर हेल्दी चमक दिसून येते.
हे ही वाचा : या पदार्थांचे सेवन केल्यास, १०० टक्के रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येणार
पिगमेंटेशनसाठी फायदेशीर
आजकाल 100 पैकी 75 जणांना पिगमेंटेशन असल्याचे रिपोर्ट सांगते. आजकाल सूर्यप्रकाश, हार्मोनल बदल, प्रदूषण आणि ताणतणाव यामुळे चेहऱ्यावर काळे डाग पडणे किंवा पिगमेंटेशन होणे सर्वसाधारण बाब बनली आहे. हे घालवण्यासाठी बीटरूट मध्ये असलेले व्हिटॅमिन C हे मेलालिन कमी करण्याचे महत्वपूर्ण काम करते. बीटरूटचा फेसपॅक वापरल्यास चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास सुरुवात होते. आणि त्वचा उजळण्यास मदत होते.
असा तयार करा फेसपॅक
बीटरूट आणि दहीचा फेसपॅक
बीटरूट आणि दही या गहनचे मिश्रण करून तयार केलेला फेसपॅक त्वचेचा टोन उजळवण्यासाठी मदत करतो. आणि पोर्स टाईट करतो. जर तुम्ही 2 चमचे बीटरूट ची पेस्ट 1 चमचा दहीत मिक्स करून 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवल्यास तुम्हाला फायदा जाणवेल. तुम्हाला फ्रेश, ताजेतवाने, ग्लोइंग आणि चेहरा मुलायम जाणवेल.
बीटरूट आणि गुलाबपाणी फेसपॅक
बीटरूट आणि गुलाबपाणीचे मिश्रण संवेदनशील त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे मिश्रण तयार करण्यासाठी 2 चमचे बीटरूटचा रस आणि गुलाबपाणी घ्या. हे मिश्रण मिक्स करून त्याचा हलका असा लेयर 10 ते 12 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून घ्या. तुम्हाला चेहऱ्यावर गुलाबी चमक जाणवेल. आणि चेहऱ्याला हायड्रेशन मिळेल.
बीटरूट आणि बेसनपीठ
तुमचा चेहरा टॅन झाला असेल किंवा चेहऱ्यावर डार्क पॅचेस आले असतील तर बीटरूट आणि बेसनपीठाचा फेसपॅक लावा. ज्यामुळे टॅनिंग कमी होईल. आणि चेहऱ्यावर ब्राईटनेस दिसेल. यासाठी 1 चं,चा बेसन पीठ घ्या. त्यामध्ये बीटरूट पेस्ट आणि हळद मिक्स करा. आणि हे मिश्रण चेहऱ्याला 15 मिनिटे लावा. फरक लगेच जाणवेल.












