Ranveer Singh Kantara scene controversy : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) वेळी व्यासपीठावरून कांतारा: चॅप्टर १” मधील ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचे कौतुक केले होते. त्यानंतर चित्रपटातील देवाचा उल्लेख महिला भूत (femaleghost) सोबत केल्याने रणवीर सिंगला ट्रोलिंग चा सामना करावा लागला होता. त्याच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड वाद निर्माण झाला होता. आता रणवीर सिंग ने याप्रकरणाबाबत माफी मागितली आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सध्या गोव्यात सुरु आहे. या महोत्सवावेळी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग ने कांतारा चॅप्टर 1 चित्रपटात दाखवलेल्या देवाचा महिला भूत म्हणून नक्कल उतरवली. यामुळे सोशल मीडियावर वादाची ठिणगी पेटली होती. त्यानंतर अनेकांच्या भावना दुखावण्याचा आल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. यावेळी रणवीर सिंहने संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देऊन सोशल मीडियावर पोस्ट करत माफी मागितली. तो या कृतीमुळे क्षमस्व असल्याचे त्याने सांगितले.
हे ही वाचा : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची कॉलेजची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल; कमेंटचा वर्षाव
काय होती पोस्ट
मंगळवारी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग ने इंस्टाग्रामच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले कि, “माझा हेतू फक्त चित्रपटातील ऋषभ शेट्टीच्या अभिनयावर प्रकाश टाकणे हा होता. मला माहिती आहे, हा अभिनय करणे त्याच्यासाठी अत्यंत कठीण आहे. मला त्याबद्दल आदर देखील आहे. मी नेहमीच माझ्या देशातील संस्कृती, परंपरा आणि श्रद्धांचा आदर करतो. जर मी कोणाचे मन दुखावले असेल तर मी मनापासून माफी मागतो.”

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सूत्रसंचालन करण्यासाठी रणवीर सिंग स्टेजवर आला होता. त्यावेळी त्याने रजनीकांत आणि ऋषभ शेट्टी यांना भेटण्यासाठी स्टेजच्या खाली आला. त्यानंतर त्याने चित्रपटात दाखवलेला चामुंडा देवीचा अभिनय केला. आणि नक्कल करायला सुरुवात केली. त्यानंतर ऋषभ शेट्टीने नक्कल करण्यापासून रोखले.
काय होते प्रकरण
अभिनेता रणवीर सिंग ने सुरुवातीला ऋषभ शेट्टीच्या कांतारा मधील अभिनयाचे कौतुक केले. त्यानंतर म्हणाला कि, “ऋषभ, मी कंतारा थिएटरमध्ये पाहिला. तू उत्तम अभिनय केलास. विशेषतः जेव्हा महिला भूत तुझ्या शरीरात प्रवेश करते. तो अभिनय, तो एक शॉट, खरोखरच अद्भुत होता.” यानंतर त्याने त्या अभिनयाचे अनुकरण केले. आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडियावर याकारणाने काही दिवस प्रचंड ट्रोल करण्यात आले.












