Top News

आज दिसणार 2025 मधील शेवटचा सुपरमून; मार्गशीष पौर्णिमेला चुकूनही करू नका या गोष्टी

Last supermoon of 2025 shining brightly on Margashirsha Purnima

Margashirsha Purnima Last Supermoon 2025 : मार्गशीष महिना सुरु झाला असून आज मार्गशीष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे. आणि एवढंच नाही तर आज दत्त जयंतीथा पौर्णिमा आहे. म्हणजेच आज दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. आजचा दिवस खास मानला जात असून आजच्या दिवशी काही गोष्टी कटाक्षाने टाळणे गरजेचे आहे. कोणत्या आहेत त्या 10 गोष्टी ज्या करणे आज तुम्ही टाळू शकतात. ते आपण आज या लेखातून पाहणार आहोत.

हिंदू धर्मानुसार प्रत्येकी महिन्यात येणारी पौर्णिमा ही शुभ असते. असं म्हणतात की पौर्णिमेला केलेल्या व्रतामुळे चांगलं पुण्य मिळतं. आजचा दिवस म्हणजे आज असणारी पौर्णिमा देखील याला अपवाद नसून आज अत्यंत शुभदिवस असल्याचे मानले जाते. आणि आज या वर्षातील शेवटचा सुपरमुन देखील असल्याचे समोर आले आहे. याचा अर्थ चंद्र आज पृथ्वीच्या जास्त जवळ असणार आहे. आजचा हा वर्षातील शेवटचा सुपरमून नक्की पहा. आजचे हे दृश्य मिस करू नका. आज आज प्रामुख्याने काही गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा.

हे ही वाचा : दत्त जयंतीनिमित्त दुमदुमली नृसिंहवाडी; दोन लाख भाविकांची रेलचेल

आज मार्गशीष पौर्णिमेनिमित्त तुम्ही गंगा स्नान करण्याचे ठरवले असेल तर घराबाहेर पडण्यापूर्वी स्नान करूनच बाहेर पडा. कारण गंगा हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तिथे तण मन शुद्ध असणे गरजेचे आहे. एशिअवय आज तुम्ही पौर्णिमेच्या पूजेवेळी लावलेला दिवा तुमच्या किंवा इतरांच्या निष्काळजीपणामुळे विझवू देऊ नका. आज कोणताही दान धर्म करताना मनात गर्व ठेऊ नका. आज पुरुषांनी दाढी कटिंग करणे टाळा.

मार्गशीष महिन्यातील पौर्णिमेला तामसी गोष्टींपासून दूर राहा एवढेच नाही तर या दिवशी चुकूनही मांसाहार, मद्यपान करू नका. आजच्या दिवशी कोणाशीही वाईट वर्तन करू नका. मन शांत ठेवा आणि शक्य असल्यास जप करावा. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी काळे कपडे परिधान करू नका. कारण त्याचा मनावर नकारात्मक परिणाम दिसून येतो. आज कोणाची निंदा करू नका. भांडण तंटे यापासून दूर राहा. आणि महत्वाचे म्हणजे खोटे बोलू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts