Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जुलै 2026 मध्ये आहेत हे महत्त्वाचे सण आणि व्रत; जाणून घ्या संपूर्ण महिन्याचे कॅलेंडर
लाईफस्टाईल

जुलै 2026 मध्ये आहेत हे महत्त्वाचे सण आणि व्रत; जाणून घ्या संपूर्ण महिन्याचे कॅलेंडर

जुलै 2026

July 2026 Hindu Festivals: जुलै 2026 हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा महिना ठरणार आहे. या महिन्यातील एकादशी, गुरु पौर्णिमा, रथयात्रा आणि इतर प्रमुख सणांची संपूर्ण माहिती येथे वाचा.

जुलै २०२६ हा (July 2026 Hindu Festivals) महिनाहिंदू धर्मीयांसाठी अनेक महत्वाच्या धार्मिक पर्वांनी सजलेली आहे. आषाढ महिन्यात येणारे विविध सण, व्रत आणि उत्सव यामुळे हा कालावधी भक्ती, साधना आणि धार्मिक विधींसाठी विशेष मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णू, भगवान जगन्नाथ, भगवान शिव आणि गुरूंच्या पूजनाशी संबंधित अनेक महत्वाच्या तिथी येत आहेत.

विशेष म्हणजे जगन्नाथ रथयात्रा, कर्क संक्रात, आषाढी एकादशी आणि गुरु पौर्णिमा हे जुलैमधील प्रमुख धार्मिक उत्सव आहेत. देशभरातील लाखो भाविक या दिवशी उपवास, पूजन, दानधर्म आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात.

हेही वाचा: मुंबई, कोकण, पुण्यासह अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; IMD चा मोठा इशारा

योगिनी एकादशी

आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीला विशेष धार्मिक महत्व आहे. स्मार्त परंपरेनुसार हे व्रत 10 जुलै रोजी, तर वैष्णव संप्रदायानुसार 11 जुलै रोजी पाळले जाईल. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा, विष्णू सहस्रनामाचे पठण आणि दिवसभर उपवास करण्याची परंपरा आहे. या व्रतामुळे पापांचा क्षय होऊन जीवनात सुख, शांती आणि आध्यात्मिक उन्नती मिळते, अशी श्रद्धा आहे. (Latest Marathi News)

जगन्नाथ रथयात्रा

पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा १६ जुलै रोजी साजरी होणार आहे. भगवान जगन्नाथ, बालभद्र आणि सुभद्रा यांच्या भव्य रथांची मिरवणूक लाखो भाविकांच्या उपस्थितीत निघते. या दिवशी रथाचे दर्शन आणि रथ ओढण्याला अत्यंत पुण्यकारक मानले जाते.

तसेच याच दिवशी म्हणजे १६ जुलै रोजी कर्क संक्रांत देखील आहे. सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो आणि दक्षिणायनाची सुरुवात होते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दानधर्म आणि सूर्योपासनेला विशेष महत्त्व दिले जाते. (LS Marathi News Channel)

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीपासून चातुर्मासाचा प्रारंभ होतो. धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू या दिवसापासून योगनिद्रेत जातात. त्यामुळे अनेक भाविक या दिवसापासून चार महिन्यांसाठी विशेष व्रत, जप, तप, भजन आणि सात्त्विक जीवनशैलीचे पालन सुरू करतात. तसेच लाखो भक्त पालखी सोबत पंढरपूरला पायी जातात.

गुरु पौर्णिमा

आषाढ पौर्णिमा ही यंदा 29 जुलैला साजरी होणार आहे. गुरु पौर्णिमा ही गुरु, शिक्षक आणि मार्गदर्शकांप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी वेदव्यास यांच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो. याच दिवशी सत्यनारायण पूजा, ध्यान, जप आणि दानधर्म करण्यालाही विशेष महत्त्व आहे. (Lokshevay Marathi News)

श्रावण महिन्याची सुरुवात

30 जुलै रोजी उत्तर भारतात श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. हा महिना भगवान शिवाला समर्पित असून अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात भक्त उपवास, पूजा, जलाभिषेक आणि धार्मिक विधी करतात. श्रावण महिन्यात सोमवार व्रतांना विशेष महत्त्व असून अनेक शिवमंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर भक्तिभावाचे वातावरण असते.

जुलै 2026 मधील प्रमुख सण आणि व्रत (July 2026 Hindu Festivals)

  • 3 जुलै: कृष्णपिंगळ संकष्टी चतुर्थी
  • 7 जुलै: कालाष्टमी, मासिक कृष्ण जन्माष्टमी
  • 10 जुलै: योगिनी एकादशी, मासिक कार्तिगाई
  • 11 जुलै: वैष्णव योगिनी एकादशी, गौण योगिनी एकादशी
  • 12 जुलै: रोहिणी व्रत, रवी प्रदोष
  • 13 जुलै: मासिक शिवरात्री
  • 14 जुलै: दर्श अमावस्या, आषाढ अमावस्या
  • 15 जुलै: आषाढ नवरात्री प्रारंभ, चंद्रदर्शन
  • 16 जुलै: जगन्नाथ रथयात्रा, कर्क संक्रांत
  • 17 जुलै: अनिरुद्ध चतुर्थी
  • 19 जुलै: स्कंद षष्ठी
  • 20 जुलै: आषाढ अष्टाह्निका प्रारंभ
  • 21 जुलै: पार्वती जयंती, मासिक दुर्गाष्टमी
  • 22 जुलै: भडली नवमी
  • 24 जुलै: आशा दशमी व्रत, रैवत मन्वादी
  • 25 जुलै: आषाढी (देवशयनी) एकादशी, गौरी व्रत प्रारंभ, वासुदेव द्वादशी
  • 26 जुलै: रवी प्रदोष व्रत
  • 27 जुलै: जयापार्वती व्रत प्रारंभ
  • 28 जुलै: कोकिळा व्रत, आषाढ चौमासी चौदस
  • 29 जुलै: गुरु पौर्णिमा, व्यास पूजा, आषाढ पौर्णिमा, दक्षिणामूर्ती जयंती, गौरी व्रत समाप्त
  • 30 जुलै: उत्तर भारतात श्रावण महिन्याची सुरुवात
img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts