Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती बिघडली; राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी घेतली कुटुंबीयांची भेट
Pune

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती बिघडली; राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी घेतली कुटुंबीयांची भेट

Sharad Pawar meeting the family of senior social worker Dr. Baba Adhav amid reports of his deteriorating health

Sharad Pawar visits Baba Adhav : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून राष्ट्रवादीचे कॉँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची प्रकृती गंभीर असल्याने शरद पवार यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली . बाबा आढाव त्यांच्यावर पूना हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे. ते 10 दिवसांपासून ऍडमिट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची तब्येतरी व्हावी यासाठी त्यांचे डॉक्टर आणि कुटुंबीय प्रयत्न करत आहे.

हे ही वाचा : 2026 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण होण्याची शक्यता; मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाहिली आदरांजली

आमचे वडील, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती काही दिवसापासून खराब असून अचानक तब्येत बिघडल्यामुळे दहा दिवसांपासून त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे. त्यांच्यावर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर त्यांना सध्या आय.सी.यू. मध्ये ठेवण्यात आले अशी माहिती डॉ. बाबा आढाव यांच्या कुटुंबीयांकडून मिळाली आहे.

डॉ. बाबा आढाव यांच्या कुटुंबियांकडून आवाहन करण्यात आले आहे कि, कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नयेत किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. आमच्या कुटुंबीयांकडून किंवा अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितींवरच विश्वास ठेवा. डॉ. बाबा आढाव यांच्या प्रकृतीविषयी माहिती वेळोवेळी कळविण्यात येई.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts