Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • वेस्ट इंडिजच्या जस्टिन ग्रीव्हजचं विक्रमी द्वीशतक; कसोटीच्या चौथ्या डावात ‘अशी’ कामगिरी करणारा जगातील सातवा फलंदाज
क्रीडा

वेस्ट इंडिजच्या जस्टिन ग्रीव्हजचं विक्रमी द्वीशतक; कसोटीच्या चौथ्या डावात ‘अशी’ कामगिरी करणारा जगातील सातवा फलंदाज

West Indies cricketer Justin Greaves celebrating his record double century in the fourth innings of a Test match

Justin Greaves Test double century : वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्ध घरच्या मैदानावर न्यूझीलंडला अशा कामगिरीची कल्पनाही करता आली नसती. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात, 531 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाहुण्या संघानं दुसऱ्या डावात 6 बाद 457 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून जस्टिन ग्रीव्हजनं एका टोकाला ठामपणे फलंदाजी केली, द्विशतक झळकावलं आणि सामना अनिर्णित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शाई होपनंही शतक झळकावलं, तर केमार रोचनं नाबाद 58 धावा केल्या.

531 धावांचं महाकाय लक्ष्य :

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अत्यंत रोमांचक होता. शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत सामन्याचा निकाल अनिश्चित राहिला. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान संघ पहिल्या डावात 231 धावांवर सर्वबाद झाला होता. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज संघ 167 धावांतच गारद झाला. यानंतर दुसऱ्या डावात न्यूझीलंडनं 6 बाद 466 धावांवर डाव घोषित केला. पहिल्या डावात 64 धावांच्या आघाडीवर त्यांनी वेस्ट इंडिजसमोर 531 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं. यानंतर वेस्ट इंडिजनं फक्त 74 धावांत चार विकेट गमावल्या, ज्यामुळं न्यूझीलंडचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, जस्टिन ग्रीव्हज आणि शाई होप यांच्याकडे वेगळंच नियोजन होते. पाचव्या विकेटसाठी त्यांनी केलेल्या 196 धावांच्या भागीदारीनं सामन्याचा मार्ग बदलला. शाई होपनं 234 चेंडूत 140 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर, जस्टिन ग्रीव्हजनं जबाबदारी स्वीकारली आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला.

चौथ्या डावात शतक करणारा सातवा फलंदाज :

जस्टिन ग्रीव्हजनं 388 चेंडूंचा सामना केला आणि नाबाद 202 धावा केल्या. त्याच्या डावात 19 चौकारांचा समावेश होता. यासह तो कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात शतक करणारा इतिहासतील सातवा फलंदाज बनला आहे. फलंदाजी करताना त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली, परंतु तो क्रीजवरच राहिला. त्यानं आणि केमार रोचने सातव्या विकेटसाठी नाबाद 180 धावा केल्या, ज्यानं सामना अनिर्णित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. केमार रोचनंही 282 चेंडूत नाबाद 58 धावा करत त्याचं पहिलं कसोटी अर्धशतक केलं.

हे ही वाचा : 1-1 नं मालिका बरोबरीत असताना आज निर्णायक सामन्यात भिडणार भारत-दक्षिण आफ्रिका

कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात 200+ धावा काढणारे फलंदाज :

जॉर्ज हेडली (वेस्ट इंडीज) 223 धावा : 3 एप्रिल 1930, इंग्लंडविरुद्ध, किंग्स्टन
बिल एड्रिच (इंग्लंड) 219 धावा : 3 मार्च 1939, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, डर्बन
सुनील गावस्कर (भारत) 221 धावा : 30 ऑगस्ट 1979, इंग्लंडविरुद्ध, ओव्हल
गोल्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज) 214 धावा : 28 जून 1984, इंग्लंडविरुद्ध, लॉर्ड्स
नॅथन अ‍ॅशले (न्यूझीलंड) 222 धावा : 13 मार्च 2002, इंग्लंडविरुद्ध, क्राइस्टचर्च
काइल मायर्स (वेस्ट इंडीज) 210 धावा : 3 फेब्रुवारी 2021, बांगलादेशविरुद्ध, चितगाव
जस्टिन ग्रीव्हज (वेस्ट इंडीज) 202 धावा : 2 डिसेंबर 2025, न्यूझीलंडविरुद्ध, क्राइस्टचर्च

 

शेवटच्या वेळी न्यूझीलंडनं केल्या होत्या चौथ्या डावात 450 हून अधिक धावा :

कसोटी इतिहासातील चौथ्या डावातील सर्वाधिक धावसंख्या करण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे, त्यांनी 3 मार्च 1939 रोजी डर्बनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 बाद 654 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिज चौथ्या डावात 450 धावा करणारा कसोटी इतिहासातील फक्त पाचवा संघ ठरला. शेवटच्या वेळी हा पराक्रम न्यूझीलंडनं 13 मार्च 2002 रोजी क्राइस्टचर्च कसोटीत केला होता.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts