• Home
  • राजकारण
  • भटके कुत्रे असो किंवा…मग निवडणुकांबाबत होणाऱ्या घोळाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जातीने लक्ष घालायला हवे – शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य
Top News

भटके कुत्रे असो किंवा…मग निवडणुकांबाबत होणाऱ्या घोळाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जातीने लक्ष घालायला हवे – शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य

Shiv Sena chief Uddhav Thackeray addressing a gathering, representing his statement on election irregularities

Uddhav Thackeray election statement : आज माजी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधत पक्षांना सावधगिरीचा इशारा दिला आहे, शिंदे गट आणि भाजप पक्ष प्रवेश वादग्रस्त ठरत आहे. यावरून आता युती तुटण्याच्या चर्चा सुरु असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला निवडणुकांमध्ये जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा ऍनाकोंडा म्हणून संबोधले.

अनाकोंडा गिळल्याशिवाय राहणार नाही

शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या दोघांची युती झाली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत धम्माल फटाकेबाजी केली आहे. मुंबईचा महापौर भाजपचाच बनणार असून फडणवीस हेच राज्याचा पक्ष चालवतात. त्यांचा मलिक एकच आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी चिमटा काढला. महायुतीच्या प्रवेशाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी सावध राहण्याचा देखील इशारा दिला. तसेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी गिळल्याशिवाय हा अनाकोंडा राहणार नाही असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचले.

हे ही वाचा : 2026 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण होण्याची शक्यता; मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाहिली आदरांजली

सर्वोच्च न्यायालयाने स्वतः जातीनं लक्ष घालायला पाहिजे

यावेळी अनुभवत असलेल्या निवडणूक वाईट आहे. नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घ्यायचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. परंतु अद्यापही मुंबई आणि इतर शहरातील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ दिसून येतो. परंतु त्याविषयी कोणी काहीही बोलायला तयार नाही. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्वतः जातीनं लक्ष घालायला पाहिजे, भटके कुत्रे असो किंवा इतर बाबी सर्वोच्च न्यायालय लक्ष देते. मग निवडणुकांबाबत होणाऱ्या घोळाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बोलले पाहिजे.

स्मारकाला उशीर का होत आहे

पूर्वी बूथ कैप्चर व्हायचे परंतु आता निवडणुका कैप्चर होतात. आता स्वत:ची घरे भरण्याची काम सुरू आहे, असा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला. तर सरकार विरोधी पक्ष नेते पद द्यायला घाबरत असल्याचे देखील ते म्हणाले. एवढेच नाही तर इंदू मिल स्मारकाबाबत देखील त्यांनी वक्तव्य केले असून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला उशीर का होत आहे, याचे कारण काय हे सांगा असे देखील ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts