Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • 2700 गुंतवणुकदारांना 9 कोटींनी घातला गंडा; 9400 रूपयांत 22 इंची एलईडी टीव्ही देण्याचे दिले आमिष
गुन्हा

2700 गुंतवणुकदारांना 9 कोटींनी घातला गंडा; 9400 रूपयांत 22 इंची एलईडी टीव्ही देण्याचे दिले आमिष

Fake LED TV scheme scam where 2,700 investors were duped of Rs 9 crore after being lured with a 22-inch LED TV for Rs 9,400

Investors duped in LED TV scam : दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढताना दिसत आहे. कोणतेही आमिष दाखवून फसवणूक करायची हे मूलमंत्रच आजकाल सुरु आहे. सायबर गुन्हे, फसवणुकीचे प्रमाण वाढले असून आता एका गुंतवणूकदाराला 15 महिन्याच्या शेवटी 1 हजार रुपयात 22 इंची एलईडी टीव्ही देण्याचे आमिष दाखवून 1 कोटी रुपयांना गुंडाळले आहे.

15 महिन्याच्या शेवटी 1 हजार 400 रुपयांना 22 इंची एलईडी टीव्ही देण्याचे आमिष देऊन गुंतवणूकदारांकडून 1 कोटी 19 लाख 80 हजार रूपये लंपास करण्यात आले आहे. या रक्कम लंपास करणारा आरोपी 1 वर्षांपासून फरार होता. आत नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने सापळा रचून या आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात फसवणूक केलेल्या 12 जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

आरोपी अटकेत

नाशिक पोलिसांनी सापाला रचत पकडलेल्या आरोपींनी तब्बल 2 हजार 700 गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस संशयित आरोपीचा शोध घेत असून सारंगधर यादव पानसरे असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

हे ही वाचा : कोल्हापूर – सांगली महामार्गावर भरधाव इनोव्हाची टेम्पोला धडक MCA विद्यार्थिनीचा मृत्यू

काय आहे संपूर्ण प्रकरण

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित पानसरे यासह 12 जणांनी नाशिकमधील नागरिकांना गायत्री मार्केटिंग स्किममध्ये सहभागी करून घेतले होते. या स्किममध्ये संशयितांनी गुंतवणुकदारांना दरमहा पैसे भरण्यास भाग पाडले. प्रत्येक गुंतवणूदारांना 22 इची एलईडी टीव्ही देण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले, प्रत्येक गुंतवणुकदाराला 15 महिन्याच्या शेवटी 1 हजार 400 रुपयांच्या मोबदल्यात माहितीपुस्तकात म्हटल्याप्रमाणे गुंतवणूक केलेल्या रकमेत 22 इंच एलईडी टीव्ही देण्यात आले. त्यातून संशयितांनी तब्बल 2 हजार 700 गुंतवणूकदारांचे प्रत्येकी 1 हजार 400 रूपये असे एकूण9 कोटी 12 लाख 80 हजार रूपये लंपास करण्यात आले.

हे प्रकरण 2017 पासून पेंडिंग होते. सरकारवाडा पोलीस ठाण्यात 2017 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या आरोपींना सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts