Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • निवडणुकींचे रणशिंग फुंकले, एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना
Top News

निवडणुकींचे रणशिंग फुंकले, एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना

Eknath Shinde
116

Eknath Shinde election preparation : आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकींचे रणशिंग शिंदेच्या सेनेने फुंकले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी निवडणुकीची रणनिती ठरवण्यात आली असून एकानाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीत पार पडलेल्या आणि होऊ घातलेल्या नगरपरिषदनगरपंचायत निवडणूकीसंदर्भात देखील चर्चा करण्यात आली. पुढचे दोन महिने निवडणुका असून त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तसचं मंत्री व आमदारांना अधिवेशनात हजरी लागण्याचे आदेश शिंदे यांनी दिले आहेत.

अन्य राजकीय पक्षाकडून कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो प्रयत्न हाणून पाडा, अशा सूचना या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी नेत्यांना दिल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला या बैठकीत काहीसा नाराजीचा सूर उमटल्याचं दिसून आलं. कार्यकर्त्यांना सांभाळा त्यांची कामे होती नाहीत. मित्र पक्षाकडून कार्यकर्त्यांची कामे आडवून ठेवली जात आहेत. त्यासंर्भात नेत्यांनी माहिती देत नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ! अंबादास दानवेंनी पोस्ट केला पैशांचा व्हिडिओ

शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा – एकनाथ शिंदे

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नागपूरातील हिवाळी अधिवेशनापासून ते आगामी महानगरपालिका व जिल्हा परिषद, उर्वरित नगरपरिषदनगरपंचायतीच्या निवडणुका या संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. पुढचे दोन महिने निवडणुका आहेत, काळजी घ्यावी लागेल, रोज अधिवेशनात हजेरी लावा, शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा, अशा सूचना या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

धनुष्यबाण गावागावात पोहचवण्यात यश मिळालं

राज्यात १८६ नगराध्यक्षपदाच्या आणि ४००० हजार नगरसेवक पदाच्या जागा शिवसेना लढली, धनुष्यबाण गावागावात पोहचवण्यात यश मिळालं. आजवर शिवसेनेने कधीच एवढ्या जागा लढल्या नव्हत्या. सर्वांचा अभिमान आहे. या निवडणुकीत चांगलं वातावरण होतं. आपण चांगली लढत दिली. निकालही चांगला लागेल, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी यावेळी नेत्यांचे कौतुक केलं आहे. आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणूनच एकत्र लढणार आहोत.

नव्या दमाने कामाला लागा आणि विजय खेचून आणा

काही ठिकाणी मैत्री पूर्ण लढती होतील, मात्र विजय हा महायुतीचाच होईल. युती धर्माचं पालन करा, सार्वजनिक ठिकाणी कुठेही वादग्रस्त वक्तव्य करू नका. महायुतीमध्ये संघर्ष होईल, अशी आपली वर्तणूक नसावी. नगरपरिषद निवडणूकांमध्ये काही किरकोळ वाद झाले असतील, ते आता संपलेले आहेत. झालं गेलं विसरून पुन्हा नव्या दमाने कामाला लागा आणि विजय खेचून आणा, अशा सूचना या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts