• Home
  • ताज्या बातम्या
  • नवऱ्याला गुंगीचं औषध दिलं घरातच पुरण्याचं प्रयत्न, बायकोचा डाव, सासऱ्याचा घाव
Top News

नवऱ्याला गुंगीचं औषध दिलं घरातच पुरण्याचं प्रयत्न, बायकोचा डाव, सासऱ्याचा घाव

Baramati Wife Crime

Baramati Wife Crime : बारामतीमध्ये दृश्यम चित्रपटालाही लाजवेल अशी घटना घडली आहे…दृश्यम चित्रपटात जसं हत्या करून घराच्या परिसरात गाडलं जातं, तसंच एका महिलेने केलं आहे..या महिलेने दृश्यम चित्रपट जरा जास्तच मन लावून पाहिल्याचं दिसतं…38 वर्षीय आरोपी महिलेने आधी पतीला गुंगीचे औषध दिले..या औषधीमुळे पती अर्धवट बेशुद्ध झाला..या महिलेने यानंतर पतीला जिवंत घरातच गाडण्याचा प्लॅन केला…हा प्रकार करताना महिलेच्या अंगावर काढा देखील आला नाही…महिलेने पतीला घरातील हॉलच्या गॅलरीत विटा-सिमेंटचा एक चौकोनी कट्टा बांधला… बेशुद्ध अवस्थेत असलेल्या प्रवीण जगताप यांना त्या कट्ट्यात झोपवून वरून कडप्पा फरशीने तो कट्टा पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला… पाहूयात की घटना उघड कशी झाली? बारामतीत नेमकं घडलं काय?

बारामतीत नवऱ्याला गुंगीचं औषध देऊन जिवंत गाडण्याचा प्रयत्न; पत्नीला अटक ( Baramati Wife Crime )

बारामती शहरातील जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीत राहणारे 41 वर्षीय प्रवीण जगताप ( Pravin Jagtap ) आणि त्यांची पत्नी शर्मिलासोबत ( Sharmila Jagtap ) गेल्या काही काळापासून सतत तीव्र कौटुंबिक वाद सुरू होते, अशी माहिती आहे… याच वादाच्या आणि रागाच्या भरातून शर्मिलाने पतीचा काटा काढण्याचा कट अत्यंत थंड डोक्याने रचला… 30 जुलैच्या रात्री तिने पती प्रवीण यांना गुंगीचे औषध दिले, ज्यामुळे ते अर्धवट बेशुद्ध झाले.. त्यानंतर बॅटने पतीच्या डोक्यावर आणि शरीरावर हल्ला करत गंभीर जखमी केले…पतीचा मृत्यू झाला असे समजून, पुरावा नष्ट करण्यासाठी शर्मिलाने घराच्या हॉलला लागून असलेल्या गॅलरीत आधीच विटा आणि सिमेंटचा वापर करून एक मोठा चौकोनी कट्टा बांधून घेतला होता… तिने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंभीर जखमी पतीला फरफटत नेऊन त्या सिमेंटच्या अरुंद कट्ट्यात कोंबले आणि वरून जुने कापड टाकून दिले.. हा कट्टा वरून कडाप्पा फरशी आणि सिमेंट लावून कायमचा बंद करण्यासाठी तिने 1 ऑगस्ट रोजी काही स्थानिक बांधकाम मजुरांना घरी बोलावले… कडाप्पाची जड फरशी मजुरांच्या साहाय्याने वर ठेवून तो भाग पूर्णपणे भिंतीसारखा प्लेन करण्याचा तिचा डाव होता, जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही अशी माहिती आहे…पण याबाबची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही…

पतीला बेशुद्धावस्थेत त्या कट्ट्याच्या आत झोपवून तो कट्टा कडाप्पा फरशीने बंद करण्याचा प्रयत्न शर्मिलाने केला..मात्र पतीला जीवंत मारण्याचा प्रयत्न फसला… अज्ञात व्यक्तीने 112 वर फोन करत या ठिकाणी काहीतरी संशयास्पद घडत असल्याची माहिती दिली…. शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कट्ट्यातून काढत बेशुद्धावस्थेतील प्रवीण यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.. प्रवीण यांच्यावर उपचार सुरू आहेत…

हेही वाचा : नंदुरबारमध्ये 200 मुलांवर अत्याचार, 22 वर्षीय आरोपीला अटक

महिलेने गुंगीचे औषध कुठून आणले ? ( Baramati Wife Crime )

हा भयंकर प्रकार समोर येताच बारामती परिसरात एकच खळबळ उडाली आहे…एक महिला चक्क पतीला अशा प्रकारे मारण्याचा प्रयत्न करते, हे तर विचाराच्या पलीकडेच आहे, असं नागरिकांनी म्हटलंय…आता विश्वास तरी कुणावर ठेवावा, असा प्रश्न निर्माण झालाय…वाद होत असल्याने चक्क पत्नी पतीला गुंगीचं औषध देऊन जिवंत गाडण्याचा प्रयत्न करते..जर पती त्रास देता होता, तर त्याची तक्रार पोलीस ठाण्यात करता आली असती..पण पतीला थेट जीवंत गाडण्याचा विचार तरी येतो कुठून असा प्रश्न निर्माण झालाय…याप्रकरणी प्रवीण जगताप यांचे वडील प्रकाश जगताप यांनी तात्काळ बारामती शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे…यानंतर पोलिसांनी आरोपी शर्मिलाला अटक केली आहे.. या महिलेला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता केली जात आहे… महिलेने गुंगीचे औषध कुठून आणले ? तिला या गुन्ह्यात कुणी मदत केली? महिलेने हा प्लॅन का रचला? याप्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे…

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts