Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • विभागीय अपर आयुक्तांच्या कार्यालयातील नेमप्लेटची राज्यभर चर्चा..
Top News

विभागीय अपर आयुक्तांच्या कार्यालयातील नेमप्लेटची राज्यभर चर्चा..

Officer Rajesh Khawle

Additional Commissioner office nameplate controversy : नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल अपर आयुक्त राजेश खवले यांनी लावलेल्या एक नामप्लेटची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. सरकारी काम अन् सहा महिने थांब या जुन्या गावाकडील म्हणीला छेद देण्याचं काम करणारी ही नामप्लेट सध्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. अपर आयुक्त राजेश खवले यांनी भ्रष्टाचाराला मूठमाती देण्यासाठी एक अनोखी युक्ती लढवली आहे. यामुळे सध्या ते माध्यमांच्या चांगलेच प्रकाश झोतामध्ये आले आहेत.

राजेश खवले यांनी आपल्या कार्यालयातील आपल्या नावाच्या नामप्लेटवर काही मुजकूर लिहिला आहे. ज्यामुळे अनेकांना अभिमान वाटेल. अधिकारी खवले यांनी आपल्या कार्यालयातील नेमप्लेटवर मी माझ्या पगारावर समाधानी आहेअसा स्पष्ट संदेश लिहिला आहे. त्यांच्या या कृतीमुळे प्रमाणिक आणि पारदर्शक कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या या अधिकाऱ्याची चर्चा आता केवळ प्रशासनातच नव्हे, तर सोशल मिडियावरही मोठ्या प्रमाणात होत आहे.

सरकारी कार्यालयातील कामे लवकर करून घेण्यासाठी किंवा बेकायदेशीर कामे कायदेशीर करून घेण्यासाठी अनेक लोक अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न करतात. काही व्यक्ती गोड बोलून किंवा दबाव तंत्राचा वापर करून अधिकाऱ्यांकडून मनमानी कामे करवून घेण्याचा प्रयत्न करतात. महसूल अप्पर आयुक्त राजेश खवले यांनी अशा वृत्तीच्या लोकांना आपल्या नेमप्लेटवरूनच स्पष्ट आणि थेट इशारा दिला आहे. त्यांच्या या संदेशामुळे लाच देण्याच्या विचारात असलेल्या व्यक्तीला लाच देण्याचं धाडस करणं सोपं असणार नाही. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात प्रामाणिकपणा वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा – सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

नेमप्लेटचा व्हायरल संदेश काय?

राजेश खवले यांच्या नेमप्लेटचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेकजण त्यांच्या या कृतीचे कौतुक करत आहेत. शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने ‘मी माझ्या पगारावर समाधानी आहे’ असे सार्वजनिकरित्या सांगणे हे आत्मविश्वास आणि सचोटी दर्शवते. यामुळे इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा मिळेल. खवले यांची ही नेमप्लेट आता प्रशासकीय सुधारणांसाठी एक प्रतीक बनली आहे.

अपर आयुक्त राजेश खवले यांचा प्रवास

अमरावती जिल्ह्यातील माहुली जहांगीर या छोट्या गावातून आलेल्या राजेश खवले यांनी १९९८ मध्ये पदवी पूर्ण केली. प्रशासकीय सेवेत रुजू होण्याच्या ध्येयाने त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा दिल्या. सुरुवातीला मंत्रालयीन सहायक म्हणून रुजू झाल्यानंतर, त्यांनी पुन्हा परीक्षा देऊन २००० मध्ये उपजिल्हाधिकारी हे पद मिळवले. अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि गोंदिया येथे विविध महत्त्वाच्या पदांवर काम केल्यानंतर, आता ते नागपुरात महसूल अपर आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा हा खडतर प्रवास तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts