Breaking News :
  • Home
  • देश
  • डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं रद्द केले 85 हजार व्हिसा! अनेक विद्यार्थ्यांना बसणार फटका, कारवाईचं कारण काय?
Top News

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं रद्द केले 85 हजार व्हिसा! अनेक विद्यार्थ्यांना बसणार फटका, कारवाईचं कारण काय?

US administration under Donald Trump cancels 85,000 visas, impacting thousands of international students

Trump cancels 85000 visas : अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं यावर्षी 85 हजार व्हिसा रद्द केले आहेत. इमिग्रेशन अंमलबजावणी मजबूत करण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेत अधिक सुधार करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. यातील विशेष बाब म्हणजे, रद्द केलेल्या व्हिसांमध्ये 8 हजारहून अधिक विद्यार्थी व्हिसांचा समावेश आहे. या वर्षी जानेवारीमध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी इमिग्रेशन मुद्द्यांवर सातत्यानं कठोर भूमिका घेतली आहे.

‘मेक अमेरिका सेफ अगेन’ची घोषणा :

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सांगितलं की, “जानेवारीपासून 85 हजार व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि सचिव रुबियो एका साध्या आदेशाचं पालन करत आहेत आणि ते इतक्यात थांबणार नाहीत.” पोस्टमध्ये ट्रम्प यांचा फोटो आणि ‘मेक अमेरिका सेफ अगेन’ अशी घोषणा आहे.

हे ही वाचा : ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; असं करणारा जगातील पहिला देश

कोणाचे व्हिसा रद्द :

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, 8 हजारहून अधिक विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात आले आहेत, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहेत. व्हिसा रद्द करण्याची सर्व सामान्य कारणं मद्यपान करून गाडी चालवणं, हल्ला करणे आणि चोरीसारखे गुन्हे करणे ही आहेत. या गुन्ह्यांमुळे निम्म्यांहून अधिक व्हिसा रद्द करण्यात आल्याचं सागण्यात आलं आहे. यापूर्वी व्हिसा रद्द करण्याच्या कारणांमध्ये कालावधीपेक्षा जास्त काळ राहणे, आपराधिक चिंता आणि दहशतवादाला समर्थन देणं यांचा समावेश होता. तसंच, प्रशासनानं गाझा मुद्द्यावरील निदर्शनांमध्ये सहभागी असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना लक्ष्य केलं आहे. या विद्यार्थ्यांना यहूदी विरोधी असल्याचं सांगत त्यांच्यावर व्हिसाबाबत कडक कारवाई केली आहे.

 

कधीही व्हिसा रद्द केला जाऊ शकतो :

प्रशासनाकडून व्हिसा रद्द करण्याची गती वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही वाढ अशावेळी करण्यात आली आहे, जेव्हा ट्रम्प प्रशासन आधीच 5.5 कोटी परदेशी नागरिकांसाठी व्हिसा वैध असतानाही सातत्यानं तपासणी करण्याचं धोरण वाढवित आहे. याचा अर्थ असा की, नवीन माहिती समोर आल्यानंतर कधीही व्हिसा रद्द केला जाऊ शकतो. ट्रम्प प्रशासनानं आधीच 19 देशांवर प्रवास बंदी घातली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts