Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • जागतिक स्तरावर भारताचा गौरव; पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान
Top News

जागतिक स्तरावर भारताचा गौरव; पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान

Prime Minister Narendra Modi receiving the Order of Oman, the highest civilian honour of Oman

PM Modi Order of Oman award : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेश दौरे राजनैतिक कामगिरीचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहेत. गुरुवारी ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांनी द्विपक्षीय संबंधांना नवीन उंचीवर नेल्याबद्दल पंतप्रधान मोदींना ऑर्डर ऑफ ओमान प्रदान केलं. पंतप्रधान मोदी त्यांच्या तीन देशांच्या यशस्वी दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात मस्कट इथं पोहोचले, जिथे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

आतापर्यंत 28 हून अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार :

पंतप्रधान मोदी यांची जागतिक ओळख विविध देशांनी त्यांना 28 हून अधिक सर्वोच्च नागरी सन्मानांनी सन्मानित केलं आहे यावरुन अंदाज लावता येतो. अलिकडच्या काळात, त्यांना इतर दोन प्रमुख सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे:

इथियोपिया: ‘इथियोपियाचा महान सन्मान चिन्ह’
कुवैत: ‘ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर’

हे ही वाचा : अमेरिकेचा व्हेनेझुएलासोबतचा संघर्ष वाढला; पूर्व प्रशांत महासागरात अमेरिकन नौदलाचा जहाजावर प्राणघातक हल्ला

राजनैतिक संबंधांचा 70 वा वर्धापन दिन साजरा :

पंतप्रधान मोदींचा ओमान दौरा खूप खास आहे, कारण भारत आणि ओमान त्यांच्या राजनैतिक संबंधांचा 70 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. पंतप्रधान बुधवारी मस्कट येथे पोहोचले तेव्हा त्यांचं भव्य स्वागत करण्यात आले आणि त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. सुलतान यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

 

मागील जॉर्डन आणि इथिओपियाचा दौरा : (PM Modi Order of Oman award)

या तीन देशांच्या दौऱ्यात जॉर्डन आणि इथिओपियानंतर पंतप्रधान मोदींचा ओमानचा दौरा धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. ओमान हा आखाती प्रदेशातील भारताचा सर्वात जुना संरक्षण भागीदार आहे आणि दोन्ही देश सध्या त्यांची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करत आहेत.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts