Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • गोला बनला मोठा दादा; भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
मनोरंजन

गोला बनला मोठा दादा; भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

Bharti Singh and Harsh Limbachiyaa with their newborn baby and elder son Gola at home

Bharti Singh welcomes baby boy : कॉमेडियन भारती आणि हर्षच्या घरी आज गोंडस बाळाचे आगमन झाले आहे. भारतीने चिमुकल्या बेबी बॉयला जन्म दिला आहे. 19 डिसेम्बररोजी हार्स लिंबाचिया आणि भरती सिंगला दुसऱ्यांदा पुत्ररत्न प्राप्ती झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॉमेडियन भारती सिंह शूट मध्ये असतानाच तिला अचानक प्रसूदी वेदना सुरु झाल्या. यामुळे तिला तातडीने हॉस्पिटलाईज करावे लागले.

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया हे दोघे दुसऱ्यांदा आईबाबा झाले आहे. त्यांना याआधी एक मुलगा झाला. आणि दुसऱयांदा देखील मुलगा झाला आहे. भारती सिंहने गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. गोला दादा होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. सोशल मीडियावर भरती आणि हर्ष दुसऱ्यांदा पुत्रप्राप्ती झाल्याचे समजल्यानंतर चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार , आज सकाळपासून भारती सिंह शूटमध्ये बिझी होती. या शूट दरम्यान अचानक प्रसूती वेदना सुरु झाल्या. आणि भारतीला सेट वरील सदस्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी हार्स लिंबाचिया हॉस्पिटल मध्ये भारती सोबत उपस्थित होता. भारतीने हॉस्पिटल मध्ये दुसऱ्या बेबी बॉयला जन्म दिला असून आता गोला मोठा दादा झाला आहे. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया दोघांनी देखील या गोंडस पाहुण्याचे स्वागत केले.

भारती सिंह ने 2017 या वर्षी लेखक आणि निर्माता हर्ष लिंबाचिया सोबत लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर भारती आणि हर्षला 2022 साली मुलगा झाला. त्याचे नाव आहे लक्ष्य, त्याला प्रेमाने सर्वजण गोला म्हणतात. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात हर्ष आणि भारतीने सोशल मीडियावर we are pregnant again या आशयाची पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी भारती सिंगने बेबी बंप फ्लॉन्ट करत रोमँटिक फोटो शेअर केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts