Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नामनिर्देशन प्रक्रियेला आज पासून होणार सुरुवात
Pune

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नामनिर्देशन प्रक्रियेला आज पासून होणार सुरुवात

Nomination process begins for Municipal Corporation general elections

Municipal Corporation Election Nomination Process : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा मागी आठवड्यात करण्यात आली होती. आत आज पासून निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर 30 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. म्हणजेच आजपासून महापलिकनचं निवडणूक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवार आज अर्ज दाखल करतील.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया आज पासून सुरू होत आहे. ही प्रक्रिया निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पार पडणार आहे, याबाबत माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली.

स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये सुरू

निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि नियमानुसार पार पडावी यासाठी महापालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारांना प्रभागनिहाय नामनिर्देशन पत्रे 30 डिसेंबर 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने दाखल करता येणार आहेत. तर अंतिम दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत उमेदवार नामनिर्देशन पत्रे घेऊन जाऊ शकतात. यासाठी प्रत्येक कार्यालयात आवश्यक प्रशासकीय यंत्रणा, कर्मचारी तसेच तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा : पहा कुठे कुणाची सत्ता; या जिल्ह्यातील नगरसेवकांची यादी आली समोर

चिन्ह वाटप 3 जानेवारी 2026 रोजी

प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी 31 डिसेंबर 2025 रोजी होणार असून उमेदवारी माघारीसाठी 2 जानेवारी 2026 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.

नामनिर्देशन प्रक्रियेसाठी वेळेचे काटेकोर पालन करावे

नामनिर्देशन पत्रांची छाननी, वैधता तपासणी, उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्याचे सर्व टप्पे निवडणूक आयोगाच्या घोषित कार्यक्रमानुसार राबविण्यात येणार आहेत. उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी नामनिर्देशन प्रक्रियेसाठी ठरवून दिलेल्या वेळेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

नामनिर्देशन पत्रे दाखल करताना घ्या ही काळजी

याशिवाय, नामनिर्देशन पत्रे दाखल करताना उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे तसेच अनिवार्य शुल्क वेळेत सादर करणे आवश्यक आहे. नामनिर्देशन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असून, कोणतीही त्रुटी आढळल्यास संबंधित नामनिर्देशन बाद होऊ शकते, याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts