Ranveer Singh Don 3 exit : धुरंधर चित्रपटाच्या यशानंतर धुरंधर फेम अभिनेता रणवीर सिंग लवकरच डॉन 3 या चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. परंतु आता एका मीडिया हाऊसच्या वृत्तानुसार रणवीर सिंग ने डॉन 3 मधून माघार घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. या वृत्ताने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली असून आता नवीन डॉन कोण ? याकडे लक्ष केंद्रित झाले आहे.
नुकतंच धुरंधर चित्रपट 600 कोटींचा टप्पा पार करण्याच्या मार्गावर आहे. धुरंधर चित्रपटाच्या यशानंतर धुरंधर चित्रपटातील अभिनेता रणवीर सिंग आता डॉन 3 चित्रपटात मुख्य भूमिकेत म्हणजेच डॉन च्या भूमिकेत दिसणार आहे या चर्चा रंगल्या होत्या. त्याने या चित्रपटासाठी वर्कआउट देखील सुरु केल्याची माहिती मिळाली होती. परंतु आता डॉन ची जागा पुन्हा रिकामी झाली आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, अभिनेता रणवीर सिंगने डॉन 3 मधून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. या वृत्ताने बॉलिवूड मध्ये खळबळ उडाली असून चाहत्यांना देखील हा धक्का आहे.
डॉन चा सिक्वेल
चंद्रा बरोट दिग्दर्शित डॉन हा चित्रपट पहिल्यांदा 1978 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर 2006 साली डॉनचा सिक्वल डॉन 2 आला. या सिक्वेल मध्ये डॉनची भूमिका अभिनेता शाहरुख खान यांनी साकारली होती. हा चित्रपट फरहान अख्तर यांनी दिग्दर्शित केला होता. तर आताचा सिक्वेल डॉन 3 देखील फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी दिग्दर्शित करणार आहे.
#EXCLUSIVE: #RanveerSingh WALKS OUT of #Don3!
Given the scale and legacy of the Don franchise, the third installment demands an actor with unmatched screen presence. Who according to you can step into the iconic role?https://t.co/7sYfB1aJVB
— Pinkvilla (@pinkvilla) December 23, 2025
यांनी केली भूमिका अजरामर
डॉन हा चित्रपट अमिताभ बच्चन यांनी अजरामर केला होता. त्यांनी या चित्रपटातून डॉन ची भूमिका साकारत चाहत्यांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्यानंतर या चित्रपटातील पुढील भागात म्हणजे डॉन 2 मध्ये बॉलिवूड मधील किंग शाहरुख खानने या चित्रपटात डॉनची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केले. आणि आता डॉन 3 या चित्रपटाकडून जास्त अपेक्षा होत्या. परंतु रणवीर सिंगच्या माघारमुळे डॉन 3 मध्ये डॉन ची भूमिका कोण साकारणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
रणवीर सिंग बाहेर पडण्याचे कारण
डॉन 3 या आगामी चित्रपटातून अभिनेता रणवीर सिंग बाहेर पडण्याचे अधिकृत कारण समोर आले नसून यामागे स्क्रिफ्ट बद्दल असहमती असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी सोशल मीडियावर रणवीर सिंगला डॉन च्या भूमिकेत तो कसा फिट दिसेल याबाबत चर्चा सुरु होती. परंतु आता हि भूमिका दुसरा कोण साकारणार ? तो या भूमिकेसाठी पसंतीस उतरेल का ? असा सवाल उपस्थित होतो. आता डॉन 3 साठी डॉन निवडणे आता निर्मात्यांसाठी एक आव्हानच असणार आहे. कारण या भूमिकेसाठी पात्र अभिनेता देखील त्याच पात्रतेचा हवा.












