Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • शरद पवारांना मोठा धक्का! नाकावर टिच्चून राहुल कलाटेंचा भाजप प्रवेश
Top News

शरद पवारांना मोठा धक्का! नाकावर टिच्चून राहुल कलाटेंचा भाजप प्रवेश

Rahul Kalate joins BJP

Rahul Kalate joins BJP : राष्ट्रवादी शरद पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसलाय. शरद पवार गटाचे विधानसभा लढवलेले उमेदवार आणि माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी आज भाजप मध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पक्षप्रवेशाला भाजपमधील पदाधिकाऱ्यांनीच मोठा विरोध केला होता. मात्र स्थानिक नेत्यांच्या विरोधाला नजुमानता त्यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथील पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश केला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून पिंपरी चिंचवड विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, आता ती खरी ठरली आहे. राहूल कलाटे यांना भाजपच्या स्थानिक नेत्याचा मोठा विरोध होता, मात्र त्यांच्या नाकावर टिच्चून आज त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या हस्ते पक्ष प्रवेश घडवून आणला.

हेही वाचा – पुण्यात दोन्ही पवार एकत्र आल्यास, ठाकरेंची सेना वेगळं लढणार..

राहुल कलाटे यांनी 2024 मध्ये भाजपचे चिंचवडमधील आमदार शंकर जगताप यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि महापालिका गटनेते म्हणून कलाटे यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. शंकर जगताप यांना कलाटे यांनी जोरदार टक्कर दिली मात्र, त्यांचा पराभव झाला.

भाजप कार्यकर्त्यांचा कलाटेंच्या पक्षप्रवेशाला विरोध

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध झाला होता. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली होती. ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून 25 क्रमांकाच्या प्रभागासाठी राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वाटल्याने भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध होता. मात्र, कलाटे यांनी त्यांच्या नाकावर टिच्चून भाजप पक्ष प्रवेश केला.

कलाटे यांचा प्रचार आम्ही कसा काय करायचा?

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि विद्यमान आमदार शंकर जगतापांच्या विरोधात लढलेल्या कलाटे यांचा प्रचार आम्ही कसा काय करायचा?, असा सवाल या नाराजांनी उपस्थित केला होता. भाजपचे वरिष्ठ आमच्यावर अन्याय होऊ देणार नाहीत. असं झालं तर आम्ही त्यावेळी वेगळी भूमिका घेऊ, असा निर्वाणीचा इशाराही भाजपमधील इच्छूक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींना दिला होता. पिंपरी चिंचवड शहरात भाजप विस्ताराचा प्रयत्न करत असला तरी आयात उमेदवारांमुळे कार्यकर्ते दुखावले जात असल्याची ही चर्चा आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts