• Home
  • महाराष्ट्र
  • दुचाकी हटवण्याच्या कारणावरून ५३ वर्षीय व्यक्तीवर दगडांनी प्राणघातक हल्ला
Mumbai

दुचाकी हटवण्याच्या कारणावरून ५३ वर्षीय व्यक्तीवर दगडांनी प्राणघातक हल्ला

53-year-old man injured after stone attack during two-wheeler dispute

53-year-old man attacked over two-wheeler dispute : मीरा भाईंदर याठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. किरकोळ वादातून एका 53 वर्षीय व्यक्तीला दगडाने मारहाण करण्यात आली. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांकडून होत आहे.

माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना गोडदेव गावात घडली आहे. दुचाकी हटवण्याच्या किरकोळ कारणावरून गावातील कथित गुंडांनी ५३ वर्षीय अनिल अधावडे व्यक्तीवर दगडांनी अमानुष मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.पीडित व्यक्तीला इतकी जबर मारहाण करण्यात आली की त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. खासकरून या घटनेचे स्पष्ट सीसीटीव्ही पुरावे उपलब्ध असतानाही नवघर पोलिस ठाण्याकडून अपेक्षित तत्काळ कारवाई होत नसल्याचा आरोप पीडितांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

हे ही वाचा : बोअरची मोटार काढताना विजेचा धक्का;दोन पितापुत्रांसह चार जणांचा जागीच मृत्यू

आम्हालाही मारहाण झाली

पीडित व्यक्ती न्याय मागण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले असता आरोपींना अटक करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम पोलीस करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. आरोपींकडूनही “आम्हालाही मारहाण झाली” असा दावा पोलिसांसमोर करण्यात येत असून, त्या आधारे पीडितावरच गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

दोषींवर कठोर कारवाई करावी

सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमके कोण मारहाण करत आहे आणि कोण पीडित आहे, हे स्पष्टपणे दिसत असतानाही पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पीडित व्यक्तीला न्याय मिळणार की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून निष्पक्ष तपास करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts