Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • अकोला, पुण्यात बघायला मिळाला ‘गल्लीत गोंधळ-दिल्लीत मुजरा; अधिकाऱ्यांना दिले चिल्लर
Top News

अकोला, पुण्यात बघायला मिळाला ‘गल्लीत गोंधळ-दिल्लीत मुजरा; अधिकाऱ्यांना दिले चिल्लर

Protesters submit coins as security deposit during agitation in Akola and Pune

Akola Pune political protest news : अकोल्यात महानगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज करण्यासाठी आलेल्या एका उमेदवाराने अनामत रक्कम भरण्यासाठी चिल्लर आणल्याचा प्रकार समोर आला आहे, त्याने आणलेली नाणी मोजताना अधिकाऱ्यांना अक्षरश: घाम फुटल्याचे बघायला मिळाले. तर पुण्यात देखील अशाच प्रकारची घटना बघायला मिळाली.

राज्यात निवडणूक आयोगाने महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर उमेदवारांची लगबगवाढली असून उमेदवारांकडून नवनवीन प्रगोग पहायला मिळत असतांनाच अकोल्यातून एक अजब प्रकार समोर आलाने “गल्लीत गोंधळ -दिल्लीत मुजरा ” या सिनेमातील मकरंद अनाजपुरे यांचे चित्र समोर येत आहे. अकोल्याच्या झोन क्रमांक ५ च्या प्रभाग क्रमांक १५ मधील लोक तांत्रिक जनाधार पार्टी चे उमेदवार लक्ष्मीकांत अग्रवाल यांनी उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करतांना चक्क अमानत रक्कम जमा करतांना पाच आणि दहा रुपयांचे ३ हजार ५०० रुपयाचे चिल्लर नाणे व १ हजार ५०० रुपयांच्या नोटा आणल्याने चिल्लर मोजतांना अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला आहे.

चिल्लर मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक

लक्ष्मीकांत अग्रवाल यांनी मोठ्या पिशव्यांमध्ये चिल्लर घेऊन निवडणूक कार्यालयात दाखल झाले. नियमांनुसार अमानत रक्कम स्वीकारणे बंधनकारक असल्याने अधिकाऱ्यांना ती रक्कम मोजावी लागली. मात्र नाण्यांची संख्या इतकी मोठी होती की ती मोजताना निवडणूक कर्मचाऱ्यांच्या अक्षरशः नाकीनऊ आले. बराच वेळ या प्रक्रियेत गेला. नाण्यांचे संख्या पाहता अधिकारीही क्षणभर अवाक झाले.

हे ही वाचा : पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

कार्यालयातील कामकाज काही काळ खोळंबले

या प्रकारामुळे कार्यालयातील कामकाज काही काळ खोळंबले होते. तथापि, सर्व नाणी मोजून अमानत रक्कम पूर्ण असल्याची खात्री झाल्यानंतर अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आला. या अनोख्या प्रकारामुळे उपस्थित नागरिक, कर्मचारी आणि इतर उमेदवारांमध्येही उत्सुकता ही पाहायला मिळाली.

उमेदवारी अर्ज दाखल करताना अनामत रक्कम भरण्यासाठी वापरले चिल्लर

पुण्यातील प्रभाग क्रमांक २६ (ड) घोरपडी पेठ–गुरुवार पेठ–समताभूमी येथून अपक्ष उमेदवार गणेश किरण खानापुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबतची अनामत रक्कम त्यांनी चिल्लर स्वरूपात सादर केल्यामुळे कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नाण्यांची मोजणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेळ लागला. या अनोख्या प्रकारामुळे उपस्थित उमेदवार, नागरिक आणि कर्मचारी यांच्यात चर्चेचा विषय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts