Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • महापालिका निवडणुकांपूर्वीच भाजपने उघडले खाते; कल्याण डोंबिवलीत बिनविरोध निवडून आल्या या महिला
Mumbai

महापालिका निवडणुकांपूर्वीच भाजपने उघडले खाते; कल्याण डोंबिवलीत बिनविरोध निवडून आल्या या महिला

BJP woman candidate elected unopposed ahead of Kalyan Dombivli municipal elections
131

BJP unopposed win Kalyan Dombivli municipal elections : महाराष्ट्र राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी जाहीर करण्याचे काम आता सुरु आहे. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आता निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपचे दोन उमेदवार विजयी ठरले आहेत. हे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने कल्याण डोंबिवली महापालिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

भाजपाने उघडले खाते

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने खाते उघडले आहे. दोन महिला बिनविरोध निवडून आल्याने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री यांची थेट व्हिडिओ कॉल द्वारे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिनविरोध निवडून आलेल्या रेखा चौधरी प्रभाग क्रमांक 18 A तर आसावरी केदार नवरे प्रभाग क्रमांक 26 क या प्रभागातील उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आपले खाते उघडले असे मुख्यमंत्री बोलताच सर्वच कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव बघायला मिळत आहे.

हे ही वाचा : घराणेशाही जोमात, कार्यकर्ते कोमात! ‘या’ नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

भाजपाचा दुसरा बिनविरोध डोंबिवली पूर्वेतील पॅनल क्रमांक २६ क मध्ये भाजपाच्या आसावरी नवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्याच्या समोर अन्य कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने त्याची निवड बिनविरोध झाली आहे. महापालिका निवडणुकीत कल्याण डोंबिवली येथे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत बघायला मिळणार आहे. या महापालिकेत एकूण 122 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts