Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • धक्कादायक! अकोल्यात तंबाखू मागण्यावरून वाद; 41 वर्षीय व्यक्तीची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या
गुन्हा

धक्कादायक! अकोल्यात तंबाखू मागण्यावरून वाद; 41 वर्षीय व्यक्तीची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या

Police investigation after a man was killed in Akola over a tobacco dispute

Akola murder over tobacco dispute : अकोला शहरात शुल्लक कारणावरून वादाचे पर्यवसान हत्येत होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, बुधवारी रात्री अशीच एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. केवळ तंबाखू मागण्यावरून झालेल्या वादातून एका ४१ वर्षीय व्यक्तीची लोखंडी रॉडने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषी नगर भागात, मनपा शाळा क्रमांक २२ जवळ घडली.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष घावडे (वय ४१ वर्षे) आणि आरोपी राम गिराम यांच्यात तंबाखू मागण्यावरून किरकोळ बाचाबाची झाली. मात्र, या वादाने रौद्र रूप धारण केले आणि संतापलेल्या राम गिराम याने संतोष घावडे यांच्यावर लोखंडी रॉडने सपासप वार केले. या हल्ल्यात संतोष गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

५० मीटरपर्यंत फरफटत नेले

या घटनेत आरोपीच्या क्रूरतेचा कळस पाहायला मिळाला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष घावडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतानाही आरोपी थांबला नाही. त्याने जखमी अवस्थेतील संतोष यांना सुमारे ५० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. या अमानवीय कृत्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

हे ही वाचा : किडनी रॅकेटचे भारतातील कनेक्शन उघड! चंद्रपूर पोलिसांना मोठे यश

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासचक्र फिरवले. पोलिसांनी आरोपी राम गिराम याला तातडीने ताब्यात घेतले असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा (कलम १०३, भारतीय न्याय संहिता) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे, आरोपी राम गिराम हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

परिसरात पोलीस बंदोबस्त

हत्त्येच्या या घटनेनंतर कृषी नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सिव्हिल लाईन पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts