Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • किरकोळ वादातून तरुणाची हत्या; हाणामारीचा व्हिडीओ CCTV मध्ये कैद
Top News

किरकोळ वादातून तरुणाची हत्या; हाणामारीचा व्हिडीओ CCTV मध्ये कैद

CCTV footage captures brutal attack leading to youth murder

Youth murder CCTV video : नाशिक येथील म्हसरूळ परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाकरण्यातल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. मृत व्यक्ती ओळखीच्या व्यक्तीसोबत गप्पा मारत असताना संशयित आरोपी घटनास्थळी आला. आणि त्याने अचानक हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण

ही घटना काल रात्री उशिरा घडली असून रवी उशिले असं मृत्यू तरुणाचे नाव आहे. रवी उशिले ओम गवळी व संतोष गवळी यांच्यात झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रात्री साडे अकराच्या सुमारास रवी उशिले आपल्या ओळखीच्या व्यक्तीसोबत गप्पा मारत असताना संशयित घटनास्थळी आले. आणि त्याच्यावर अचानक हल्ला केला. ओम गवळी याने चॉपरने वार केले तर संतोष गवळी याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. सदर हाणामारीची घटना एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

हे ही वाचा : मावळमध्ये हुक्कासाठी लाखणाऱ्या तंबाखुजन्य पदार्थावर मोठी कारवाई तब्बल 31 कोटीचा प्रतिबंधित साठा जप्त

म्हसरूळ पोलीसांचा तपास सुरु

या हल्ल्यात रवी उशिले गंभीर जखमी झाला असून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. पोलीस आयुक्त शेखर देशमुख, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी घटनास्थळी भेट देत तपासाचे आदेश दिले.

संशयित आरोपीला अटक

गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी विल्लोळी येथील सीएनजी पेट्रोल पंपाच्या मागे लपून बसल्याचे समोर येताच म्हसरूळ पोलिसांनी अवघ्या एका तासात दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मयत रवी उशिले यांच्या कुटुंबीयांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts