• Home
  • मनोरंजन
  • सिनेमागृह गाजवल्यानंतर ‘हक’ OTT गाजवायला तयार; आता नेटफ्लिक्सवर पाहता येणार हा चित्रपट
मनोरंजन

सिनेमागृह गाजवल्यानंतर ‘हक’ OTT गाजवायला तयार; आता नेटफ्लिक्सवर पाहता येणार हा चित्रपट

Haq film starring Emraan Hashmi and Yami Gautam now streaming on Netflix

Haq film OTT release Netflix : चित्रपटप्रेमींसाठी एक आनंददायी बातमी आहे. कारण सिनेमागृहात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या हक हा चित्रपट नेटफ्लिक्स वर स्ट्रीम करण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

इम्रान हाश्मी आणि यामी गौतम यांची मुख्य भूमिका असलेला हक हा चित्रपट प्रभावी कथानकामुळे आणि दमदार अभिनयाने चर्चेत राहिला. या चित्रपटाने प्रेक्षकांचे मने जिंकून घेतली. आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात आला असून ही प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. याबाबत तरण आदर्श यांनी सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म X वर शेअर केली आहे.

तरण आदर्श यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते कि, इम्रान हाश्मी आणि यामी गौतम धर यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट हक हा सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावेळी हा चित्रपट प्रचंड प्रतिसाद मिळवणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला होता. आता OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यामुळे अधिक प्रेक्षकवर्गापर्यंत हा चित्रपट पोहोचणार आहे.

हे ही वाचा : बॉर्डर 2 चित्रपटातील “घर कब आओगे…” संपूर्ण देशासाठी भावनिक गाणे; वरून धवन यांनी दिली प्रतिक्रिया

हा चित्रप सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुपर्ण एस वर्मा यांनी केले असून चित्रपटाची कथा आणि पटकथा रेशु नाथ यांनी लिहिली आहे. हक चित्रपटात नवोदित अभिनेत्री वर्तिका सिंग , शीबा चड्डा, दानिश हुसेन आणि असीम हट्टगंडी यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. तर चित्रपटाची निर्मिती विनीत जैन यांनी केली आहे.

सिनेमागृहात या हक या चित्रपटाने आपली जादू आजमावल्यानंतर आता हक चित्रपट OTT प्लॅटफॉर्म वर आपली जादू दाखवणार आहे. ज्या प्रेक्षकांनी मोठ्या पडद्यावर हा चित्रपट पहिला नाही त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts