Pooja Khedkar house burglary : खोटे कागदपत्रांमुळे बडतफ करण्यात आलेली आयएएस अधिकारी पूजा खेडकर आता नवीन प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या घरी भयानक चोरी घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरटयांनी पूजा खेडकरला बांधून ठेऊन तिची आई आणि वडिलांना गुंगीचे औषध देत चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
बडतर्फ पूजा खेडकर हिच्या पुण्यातील बाणेर रोडवर असलेल्या घरी चोरी झाली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास चोरटयांनी पूजा खेडकरच्या घरात घुसून चोरी केली आहे. याशिवाय आरोपीने पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांना डांबून ठेवत साहित्य लंपास केले. ही चोरी पूजा खेडकरच्या नोकर आणि त्यांच्या साथीदारांनी केली आहे.
हे ही वाचा : 1 वर्षांपूर्वी संविधानाची विटंबना करणाऱ्या आरोपीची आत्महत्या
पुजा खेडकरचे हातपाय बांधून एका खोलीत ठेवले डांबून
15 दिवसांपूर्वी पूजा खेडकरच्या घरात नेपाळहूननवीन नोकर ठेवण्यात आला होता. या नोकरानेच 6 साथीदारांच्या मदतीने चोरी केली. त्यांनी पूजा खेडकरचे हातपाय बांधून एका खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एवढेच नाही तर पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर या दोघांना गुंगीचे औषध देत बेशुद्ध केले. तर घरातील चालक, वॉचमन आणि आचारी यांना देखील बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर या सातही जणांनी घरातील कपाट तोडून मोबाईल फोन चोरले.
गुन्हा दाखल
या संपूर्ण प्रकरणानंतर पूजा खेडकरने स्वतःची कशीतरी सुटका करून चतुशृंगी पोलिसांना फोन करत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घराची पाहणी केली. यानंतर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.











