Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मीही अनेक गोष्टी सांगू शकतो! काय घडलंय, काय घडतंय हे मला सगळं दिसतंय; फडणवीसांचा इशारा
Top News

मीही अनेक गोष्टी सांगू शकतो! काय घडलंय, काय घडतंय हे मला सगळं दिसतंय; फडणवीसांचा इशारा

Fadnavis Warning Statement

Devendra Fadnavis Warning Statement : सुनेत्रा पवार यांनी नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांनी आपल्याला उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथग्रहण सोहळ्याबद्दल काहीही माहिती नाही, त्यासंदर्भात आपल्याशी चर्चा देखील झाली नाही असा दावा केला. तसंच बारा तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, असंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं. दरम्यान शरद पवार यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली, यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आता प्रतिक्रिया समोर आलीय. मीही अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलंय, काय घडतंय हे मला सगळं दिसतंय, मी त्या गोष्टींचा साक्षीदार आहे. तुम्हाला माहिती आहे, अजितदादा सगळ्या गोष्टी मला सांगायचे, माझ्याशी शेअर कारायचे, असा सूचक इशाराच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

‘खरं म्हणजे ही बोलण्याची वेळ नाहीये, पण मी यामध्ये दोनच गोष्टी सांगेल. समजा अजित पवार हे अशा कुठल्याही प्रकारच्या एकत्रिकरणाची चर्चा करत होते. तर अशी कुठलीही चर्चा ते भाजपसोबत चर्चा केल्याशिवाय करतील का? जर त्यांनी विलिनीकरणाची चर्चा केली असेल तर त्यांनी आधी भाजपसोबत चर्चा केली असती. जर त्यांनी तशी कोणतीच चर्चा केली नसेल तर मग भाग वेगळा, मी पुन्हा एकदा सांगतो मला असं वाटतं की, विलिनीकरण चर्चा करायची, नाही करायची किंवा काय करायचं हा संपूर्ण निर्णय राष्ट्रवादीचा असेल, आमची फक्त एवढीच अपेक्षा असेल की कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी आमच्याशी चर्चा करावी. तशी ते चर्चा करतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अजितदादा सगळ्या गोष्टी मला माझ्याशी सांगायचे – फडणवीस

दुसरं जर समजा अजित पवार अशा पद्धतीच्या चर्चा करत होते, तर ते काय एनडीएममधून बाहेर पडण्यासाठी चर्चा करत होते का? सरकारमधून बाहेर पडण्यासाठी चर्चा करत होते का? ते तर सरकारमध्ये स्टेबल होते, उगच काही तरी संभ्रम निर्माण करायचा आणि नंतर आपली इको स्टिस्टिम वापरून तो संभ्रम इको कारायचा, ही पद्धत अयोग्य आहे, योग्य नाहीये. कसं आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्हाला राजकारण करायचं नाहीये, नाही तर मीही अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलंय, काय घडतंय हे मला सगळं दिसतंय, मी त्या गोष्टींचा साक्षीदार आहे. तुम्हाला माहिती आहे, अजितदादा सगळ्या गोष्टी मला सांगायचे, माझ्याशी शेअर कारायचे, त्यांचा मृत्यू झाला, त्यापूर्वी जवळपास एक तास आम्ही गप्पा मारत बसलो होतो. त्यामुळे मला असं वाटतं की, खालच्या स्थराचं राजकारण करणं योग्य नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी दिलाय.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts