Rohit Pawar Files Complaint Against DGCA | 28 जानेवारीला अजित पवार (Ajit Pawar) यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) खळबळ उडाली होती. तर अजित दादांच्या दुर्दैवी अपघातानंतर (Ajit Pawar Plane Crash) अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित दादांचा खरच अपघात होता की घातपात? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामध्ये आता या अपघाताबाबत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. सोबतच त्यांनी पुरावे सादर करत DGCA आणि VSR कंपनीवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा – रोहित पवार आक्रमक! व्हिएसआर कंपनीविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी पवार कुटुंब बारामती पोलिस ठाण्यात ठिय्या..
VSR कंपनीच्या मालकाला अटक व्हावी अशी रोहित पवारांची मागणी
VSR कंपनीच्या मालकाला अटक व्हावी, अशी रोहित पवारांनी मागणी केली आहे. अजित पवारांचा अपघात झाला की घातपात झाला याची माहिती जनतेसमोर आली पाहिजे. मंगळवारी DGCA कडून एक अहवाल आला होता. त्यामध्ये VSR कंपनीतील काही त्रुटी समोर आल्यानंतर DGCA ने या कंपनीची लिअरजेट विमानं उड्डाण करण्यास बंदी आणली होती. पण, त्या अहवालातही या कंपनीला वाचवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करण्यात आला होता. जर VSR कंपनीची चूक असेल तर डीजीसीएचीही चूक आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. VSR कंपनीच्या मालकाला अटक केली पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, रोहित पवारांनी केलेल्या या मागणीनंतर ते आज (26 फेब्रुवारी) सकाळी बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत युगेंद्र पवार आणि मोठ्या संख्येने बारामतीकर उपस्थित झाले आहेत. तसेच अजितदादा अमर रहे, दादांना न्याय मिळालाच पाहिजे…, अशा घोषणाही बारामतीकरांनी दिल्या.












