Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • इराणचा मोठा निर्णय! होर्मुझ सामुद्रधुनीत भारताच्या तेल टँकर्सना केला मार्ग मोकळा, परराष्ट्र मंत्र्यांच्या मध्यस्थीला यश
Top News

इराणचा मोठा निर्णय! होर्मुझ सामुद्रधुनीत भारताच्या तेल टँकर्सना केला मार्ग मोकळा, परराष्ट्र मंत्र्यांच्या मध्यस्थीला यश

Hormuz Strait Oil Tanker | सध्या इराण (Iran), अमेरिका (US) आणि इस्त्रायल (Israel) या देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. या युद्धामुळे अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. अशातच या युद्धादरम्यान भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून (Hormuz Strait) भारतीय ध्वज असलेले तेलाचे टँकर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतासाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.

हेही वाचा – महाराष्ट्र हादरला! विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलीस अॅक्शन मोडमध्ये

एस जयशंकर यांच्या मध्यस्थीने भारताला मोठा दिलासा

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरग यांच्यासोबत चर्चा केली होती. या दोन्ही मंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय ध्वज असलेले तेलाचे टँकर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वीच इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून कोणत्याही देशाचे तेल वाहू जहाज जाऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता. यामध्ये भारताचे देखील तेलाचे टँकर्स अडकले होते. मात्र, एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरग यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर भारताचे तेलाचे टँकर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताची जहाजे सुरक्षितरित्या पास

सध्या होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताचे दोन तेल वाहून नेणारी पुषक्र आणि परिमल ही जहाजे सुरक्षितरित्या पास झाली आहेत. तर आता या सामुद्रधुनीमध्ये इस्त्रायल, अमेरिका आणि युरोप या देशांचे तेल वाहू टँकर्स अडकले आहेत. इराणने दिलेल्या इशाऱ्यामुळे या तिन्ही देशांचे टँकर्स पास होण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत.

इराणच्या समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतून दररोज जवळपास 20 मिलियन बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक होत असते. तसेच समुद्रामार्गे जी तेलाची वाहतूक होत असते त्यातील तृतीयांश वाहतूक ही होर्मुझ सामुद्रधुनीतून होत असते. ही सामुद्रधुनी जागतिक तेल खपतीचा पाचवा भाग मानली जाते. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून ही जगाच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्त्वाची सामुद्रधुनी मानली जाते.

वाढत्या युद्धामुळे इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या जल वाहतूकीवर बंधने घालण्यात आली आहेत. इराणने होर्मुझ मार्ग बंद केल्यामुळे कच्च्या तेलाची आयात-निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे. हा मार्ग बंद असल्यामुळे अनेक देशांचे टँकर समुद्रात अडकून पडले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने इराणला इशाला दिला होता. जर इराणने होर्मुझ मार्ग बंद केला तर आम्ही त्यांच्यावर घातक हल्ले करू, असा इशारा अमेरिकेने दिला होता. तर आताही अमेरिकेने इराणला मोठी धमकी दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथसोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, जर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाचा प्रवाह विस्कळीत करण्यासाठी काही हालचाल केली तर आम्ही इराणवर 20 पटीने हल्ले वाढवू, अशी थेट धमकी ट्रम्प यांनी इराणला दिली आहे. त्यामुळे आता हे युद्ध आणखी पेटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts