Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Google Maps मध्ये आले नवीन AI फीचर; आता विचारलेल्या प्रश्नांना मिळणार स्मार्ट उत्तरे
Top News

Google Maps मध्ये आले नवीन AI फीचर; आता विचारलेल्या प्रश्नांना मिळणार स्मार्ट उत्तरे

Google Maps AI Feature
92

Google Maps AI Feature: अनोळखी शहरात प्रवास करायचा असो किंवा एखाद्या ठिकाणाचे अंतर शोधायचे असो, बहुतेक लोक गूगल मॅप्सचा आधार घेतात. याच वापरकर्त्यांसाठी आता एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. गूगलने आपल्या मॅप्स अॅपमध्ये ‘Ask Maps’ नावाचे नवीन एआय फीचर सुरू केले आहे. हे फीचर नेमके काय आहे आणि ते कसे वापरायचे, चला जाणून घेऊया.

गेल्या काही महिन्यांत गूगल मॅप्समध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता या नवीन एआय फिचरमुळे वापरकर्त्यांचा अनुभव अधिक स्मार्ट होणार आहे. सध्या हे फिचर अमेरिका आणि भारतातील काही वापरकर्त्यांसाठी Android आणि iPhone वर उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या ते प्रामुख्याने इंग्रजी भाषेत काम करते, मात्र भविष्यात इतर भाषांचा सपोर्टही जोडला जाऊ शकतो.

हेही वाचा: CTET 2026 ची उत्तरपत्रिका जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत आक्षेप नोंदवण्याची संधी

प्रवासाचे नियोजन होईल सोपे

या फीचरच्या मदतीने प्रवासाची योजना करणे खूप सोपे होणार आहे. गूगल मॅप्स विविध ठिकाणांबद्दलची माहिती, वापरकर्त्यांचे रिव्ह्यू आणि रिअल-टाइम डेटा वापरून तुम्हाला योग्य सूचना देतो. त्यामुळे तुम्ही शोधत असलेल्या ठिकाणांबाबत अधिक अचूक आणि वैयक्तिक माहिती मिळू शकते. याशिवाय, तुम्ही आधी सेव केलेल्या किंवा शोधलेल्या ठिकाणांवर आधारितही मॅप्स तुम्हाला नवीन जागांची शिफारस करू शकतो.

‘Ask Maps’ फीचर कसे वापराल?

हे फीचर वापरण्यासाठी मॅप्सच्या सर्च बारखाली दिलेल्या Ask Maps बटणावर क्लिक करावे लागते. त्यानंतर चॅटबॉटसारखी विंडो उघडते, ज्यामध्ये तुम्ही थेट प्रश्न टाइप करू शकता.

उदाहरणार्थ, तुम्ही विचारू शकता “जवळपास फोन चार्ज करण्यासाठी कोणती जागा आहे?” किंवा “या शहरात चांगले कॅफे कुठे आहेत?” अशा प्रश्नांवर मॅप्स तुमच्या सध्याच्या लोकेशननुसार योग्य ठिकाणांची यादी दाखवतो.

या नवीन एआय फीचरमुळे Google Maps वापरणे आणखी सोपे होणार असून, दैनंदिन प्रवास आणि शहरातील ठिकाणे शोधणे अधिक जलद आणि सोयीस्कर होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts