Government Land Mafia : भाजपचे आमदार नरेंद्र मेहता (narendra mehta) यांचा सरकारी पत्रातच भूमाफिया असा उल्लेख करण्यात आल्याचा दावा काँग्रेस नेते नाना पटोले (nana patole) यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाने राज्यात खळबळ उडालीय. अशा प्रकारचे पत्र त्यांनी माध्यमांसमोर आणलं. एवढंच नाही तर त्यांनी स्टँप ड्युटी बुडवल्याचा गंभीर आरोपही नाना पेटोले यांनी केला. यावर उत्तर देतांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule)यांनी पटोले यांच्यावर पलटवार केला आहे. मेहता यांच्यावरून पटोले व बावनकुळे यांच्यात चांगलेच वाकयुद्द्ध पाहायला मिळाले.
हे ही वाचा : घरबसल्या LPG बायोमेट्रिक eKYC कसे करावे? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस
दरम्यान, हे पत्र २० जून २०२५ रोजीचे असल्याचे दिसून येत आहे. या पत्रात भूमाफिया नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन यांनी न भरलेल्या मुद्रांक शुल्क व दंडाच्या रक्कमेची पर्यायाने शासनाच्या थकित महसूलाची जलद वसूली करणेबाबत” असा उल्लेख करण्यात आला आहे.तर याबाबत ७ दिवसांमध्ये चौकशी करावी व पुढे या विषयाबाबत काय करणार याची माहिती देण्यात असे म्हटलेय. या पत्रावर बावनकुळे यांची सही असल्याचा दावाही पटोले यांनी केलाय.
पत्रात आमदार असा कुठेही उल्लेख नाही : बावनकुळे
मंत्री म्हणून काम करताना आपल्याकडे अनेक विषय येतात. अनेकदा तक्रारी येतात. तक्रारीनुसार लिहितो. यात आमदार असा कुठेही उल्लेख नाही. नरेंद्र मेहता यांचं नाव लिहिलेलं आहे. नाना पटोले हे राजकारण करताहेत, त्यांच्यावर मी काही बोलणार नाही. निवेदन आलं की मंत्री म्हणून काम करावं लागतं. आमदार म्हणून नाव नाही, विषय जसा आहे त्या निवेदनाद्वारे ते लिहिलेलं आहे. येत्या ७ दिवसांत या विषयीच्या निवेदनांची चौकशी करून कारवाई होईल, असे बावनकुळे म्हणाले.
मेहता यांनी कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही. तक्रारीवर चौकशी करण्यात येईल. मेहता यांच्याबद्दल १५ पत्र आली आहेत. यापूर्वी १० ते १२ तक्रारी आल्या आहेत. त्यात नरेंद्र मेहता यांचा दोष नाही. मात्र आलेल्या तक्रारीची दाखलही मंत्री म्हणून घेतली जाते. नाना पटेलांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर इथे देणे गरजेचे नाही. नानांनी सभागृहात बोलावे असे आव्हान बावनकुळे यांनी दिले आहे.
नरेंद्र मेहता यांनी आदिवासींच्या जमिनी लाटल्या : पटोले
भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांना स्टॅम्प ड्युटी दिली नाही. तिथल्या आदिवासींच्या जमिनी लाटल्या आहेत. ते सरकारवर दबाव आणत आहेत. भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता असा उल्लेख पत्रावर करण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री यांनी पक्षातील भूमाफिया ओळखले आहेत, असा टोला नाना पटोले यांनी हाणला. तर हे पत्र सभागृहात मांडणार आहोत.. याविषयी आपण कोणतेही राजकारण करत नसल्याचे पटोले म्हणाले.












