PM Modi on oil supply from Strait of Hormuz: मध्य पूर्वेत अमेरिका-इराण संघर्ष (america-iran-israiel) सुरू असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी सोमवारी देशाला मोठा दिलासा दिला. आपण सर्व संबंधित घटकांशी चर्चा करत आहोत. जिथे गरज आहे तिथे मदत दिली जात आहे. यासाठी आंतरमंत्रालयीन गट (Inter-Ministerial Group) तयार करण्यात आला असून तो दररोज बैठक घेत आहे.
सामूहिक प्रयत्नांमुळे आपण परिस्थितीला अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो. प्रधानमंत्रीनी लोकसभेत (loksabha) पश्चिम आशियातील संकटाबाबत ( Crisis in West Asia) माहिती दिली. होर्मुज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद झाल्यामुळे तेल व वायू पुरवठ्यात येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. ऊर्जा ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे त्यांनी सांगितले आणि या संकटासाठी पर्यायही सुचवला.
हे ही वाचा: इराण-इस्राईल-अमेरिका युद्ध लवकर संपावे : नरेंद्र मोदी
होर्मुज संकटाला सामोरे जाण्यासाठी २४ तास काम
सुमारे २५ मिनिटांच्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले की पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरू राहावा यासाठी दिवस-रात्र काम सुरू आहे. त्यांनी म्हटले की होर्मुजमार्गे जहाजांची ये-जा करणे अत्यंत आव्हानात्मक झाले आहे. त्यामुळे यावर २४ तास सुरक्षिततेने काम सुरू आहे.
भारताचा मोठा प्लॅन काय?
प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले की, गेल्या १०-११ वर्षांत इथेनॉल उत्पादन आणि त्याच्या मिश्रणावर मोठ्या प्रमाणात काम झाले आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण केले जात आहे, ज्यामुळे बचत होत आहे. पर्यायी इंधनावर होत असलेले काम भारताचे भविष्य अधिक सुरक्षित करेल. ऊर्जा ही अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.
पुढील धोरणांवरही भर
जागतिक ऊर्जा गरजा पूर्ण करण्यात पश्चिम आशियाची महत्त्वाची भूमिका आहे आणि सध्याच्या संकटाचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर होत आहे, असे मोदी म्हणाले. सरकार अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊन रणनीती आखत आहे. त्यांनी सौरऊर्जेच्या वापरावरही भर दिला.
६५ लाख मेट्रिक टन तेल साठ्यावर काम
ऊर्जा संकटासाठी पर्याय सांगताना मोदी यांनी नमूद केले की भारताने गेल्या ११ वर्षांत कच्च्या तेलाच्या आयातीत विविधता आणली आहे. पूर्वी भारत २७ देशांकडून तेल आणि वायू आयात करत होता, आता तो ४१ देशांकडून ऊर्जा आयात करतो. तसेच ६५ लाख मेट्रिक टन तेल साठा उभारण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी मोदी यांनी सांगितले.












