Summer Skin Care Tips | सध्या कडक उन्हाळ्याचे (Summer) दिवस सुरू आहेत. उन्हाळ्यात बाहेर पडलं की आपली त्वचा काळवंडते, घामाने पुरळ येतात अशा अनेक समस्या निर्माण होताना दिसतात. त्यामुळे उन्हाळ्यात बहुतेक लोक आपला चेहरा स्वच्छ करण्यासाठी आणि उजळवण्यासाठी महागडे फेस वॉश किंवा फेस क्लींजर वापतात. पण यामध्ये असलेले केमिकल तुमच्या त्वचेला नुकसान पोहचवू शकते. त्यामुळे तुम्ही घरगुती उपायांचा वापर करत उन्हाळ्यात तुमची त्वचा चमकदार बनवू शकता आणि चेहऱ्यावरचे टॅनिंगसुद्धा घालवू शकता.
हेही वाचा – “त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, तो माणूस…”, मोनालिसाने दिग्दर्शक सनोज मिश्रावर केले गंभीर आरोप
त्वचा चमकदार बनवण्यासाठी 3 घरगुती प्रभावी घटक
स्वयंपाकघरातील काही असे घटक आहेत जे तुमची त्वचा उजळवण्यास मदत करतात. त्यामुळे आता तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीयेत. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कोणते घटक आहेत जे तुमची त्वचा चमकदार बनवण्यास मदत करतील. चला तर मग आता आपण या घरगुती घटकांबाबत जाणून घेऊया जे खूपच प्रभावी आहेत.
1. कोरफडीचा गर – उन्हाळ्यात तुमची त्वचा चमकदार बनवण्यासाठी तुम्ही कोरफडीचा गर वापरू शकता. कोरफडीच्या गरामध्ये अनेक प्रभावी गुणधर्म असतात जे त्वचा उजळवण्यास मदत करतात आणि त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करतात. तसेच कोरफडीच्या गरात मॉइश्चरायझिंगचे गुणधर्म असतात जे त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास मदत करतात. त्यामुळे कधीही चेहरा धुण्याअगोदर तुम्ही चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावा, तो 15 मिनिटे चेहऱ्यावर तसाच लावून ठेवा. तो गर चेहऱ्यात मुरला की नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुमचा चेहरा चमकदार होण्यास मदत होईल.
2. दही – उन्हाळ्याच चेहरा धुताना दह्याचा वापर करा. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे आपल्या त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे दह्याचा वापर केल्यास चेहऱ्यावरील काळपट डाग दूर होतात. तर तुम्हाला चेहऱ्यावरील काळपटपणा घालवायचा असेल तर चेहऱ्यावर दही लावा आणि हलक्या हाताने मसाज करा, नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
3. कच्चे दूध – तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणायचा असेल तर कच्चे दूध वापरा. चेहरा धुताना तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करू शकता. कापसाच्या बोळ्याने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कच्चे दूध लावा आणि ते 2-3 मिनिटे तसेच ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सर्व घाण निघून जाण्यास मदत होते आणि तुमची त्वचा मऊ, चमकदार होते. चेहऱ्यावरील मुरूम दूर करण्यासाठी देखील कच्चे दूध प्रभावी ठरते.












