Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मंत्री झिरवाळ यांचा व्हिडीओ रेकॉर्ड आणि व्हायरल करणाराचे नाव समोर..
Top News

मंत्री झिरवाळ यांचा व्हिडीओ रेकॉर्ड आणि व्हायरल करणाराचे नाव समोर..

narhari zirwal and transgeder

Minister Zhirwal viral video : अजित पवार गटातील नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये झिरवाळ आणि तृतीयपंथी व्यक्ती दिसत आहे. यानंतर जी चर्चा रंगत होती, त्याविषयी मोठा खुलासा झाला आहे.

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या रूममध्ये मंत्री झिरवाळ आणि एक तृतीयपंथी व्यक्तीच दिसत आहेत, मग हा व्हिडिओ रेकॉर्ड कोणी केला आणि तो तब्बल सात महिन्यानंतर आत्ताच कोणी सोशल मिडियावर टाकला हे आता समोर आला आहे. याबाबत झिरवाळसोबत असलेल्या तृतीयपंथी व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाने याबाबत मोठा खुलासा केलाय.

हेही वाचा – राजकारणात खळबळ! नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

तृतीयपंथी आणि झिरवाळ दोघे बेडवर

शासकीय निवासस्थानातील हा व्हिडीओ असल्याचे सांगितलं जात आहे. तृतीयपंथी व्यक्ती आणि नरहरी झिरवाळ दोघे बेडवर दिसत आहेत. अगदी बेडरूममधील हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने नक्की हा नरहरी झिरवाळ यांचा व्हिडीओ कोणी रेकॉर्ड केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

व्हिडीओ नक्की कोणी रेकॉर्ड केला त्याचा खुलासा

कारण व्हायरल कथित व्हिडीओत काही गोष्टी रेकॉर्ड झाल्या. यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, मंत्री झिरवाळ, तृतीयपंथी व्यक्ती आणि अजून तिसराही कोणी व्यक्ती यादरम्यान रूममध्ये होता का? आता नुकताच मोठा खुलासा झाला असून हा व्हिडीओ नक्की कोणी रेकॉर्ड केला हे पुढे आलंय.

नरहरी झिरवाळ यांना व्हायरल व्हिडीओची कल्पना

व्हायरल व्हिडीओबाबत नरहरी झिरवाळ यांना अगोदरच कल्पना होती असं दिसून येत आहे. कारण मंत्री झिरवाळ यांनी त्यांच्यासोबत बेडरूमध्ये दिसत असलेल्या त्याच तृतीयपंथी व्यक्तीविरोधात याआधीच मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात खंडणी मागितली असल्याचा गुन्हा दाखल केला असल्याने त्यावरून हे स्पष्ट होतंय.

झिरवाळ आणि तृतीयपंथीचे अनेक वर्षाचे संबंध

आता राहीला विषय हा व्हिडिओ कोणी रेकॉर्ड आणि व्हायरल केला. व्हायरल होणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीचे नाव पवन यादव असून त्याचे आणि झिरवाळ यांचे जुने संबंध आहेत. तृतीयपंथी पवन यादव याचा भाऊ रवी यादव याने खुलासा करत थेटपणे सांगितले की, हा व्हायरल होणारा व्हिडीओ नक्की कोणी व्हायरल केला. रवी यादव याने म्हटले की, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ दिसत आहे आणि माझा भाऊ पवन यादव हा आहे. हा व्हिडीओ माझा भाऊ पवन यादव यानेच रेकॉर्ड केला.

झिरवाळ आणि तृतीयपंथीची अनेक वर्षे अनैतिक संबंध

तृतीयपंथी पवन यादव याच्यासोबत नरहरी झिरवाळ याने अनेकदा अनैतिक संबंध ठेवल्याचा दावाही रवी यादव याने केला आहे. पवन याला सरकारच्या तृतीयपंथी बोर्डात मोठे पद हवे होते मात्र, ते टाळाटाळ करत होते. त्याचा आणि झिरवाळचा अनेक वर्षाचा संबंध आल्याचे रवी यादव यांनी सांगितले. रवी यादव यांनी नरहरी झिरवाळ यांच्यावर अजून काही गंभीर आरोप केले आहेत.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts