ashok kharat case: नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (ashok kharat) याचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत. आता आणखी एक कारनामा समोर आला असून निवडणूक जिकून देण्यासाठी अशोक खरातने अघोरी विद्येचा प्रकार केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, निवडणूक जिंकण्यासाठी खरातच्या संपर्कात आलेली ती महिला कोण? असाही सवाल केला जात आहे. दरम्यान, SIT कडून संबंधित महिला नेत्याची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणुकीत यशासाठी अनेक नेते खरातकडे गेल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
हे ही वाचा: आनंदाची बातमी…लाडक्या बहिणींसाठी ! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज दुरुस्ती अन् ई-केवायसी
CCTV फुटेज SIT च्या हाती
खरातच्या कार्यालयात संबंधित नेत्या आणि कुटुंब वारंवार येत असल्याची माहिती समोर आले आहे. खरात याच्या कार्यालयातील CCTV फुटेज SIT च्या हाती लागले आहे. त्या सर्वांना चौकशीसाठी बोलवण्यात येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
खरात याची चौकशी
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याची SIT कडून कसून चौकशी केली जात आहे. त्याशिवाय खरातकडे गेलेले तसेच पीडित महिलांचा जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात येत आहे. आतापर्यंत खरातवर ६ पेक्षा जास्त गुन्हे नोंदवण्यात आले आहे. खरातही कोट्यवधींची माया आणि शेकडो एकर जमिनीचा कारभारही समोर आला आहे. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला नेत्यानं खरातकडे पूजा केल्याचं समजतेय.
महिला नेत्याची खरातकडे पूजा
लोकसभा निवडणुकीत जिंकण्यासाठी महिला नेत्यानं खरातकडे पूजा केल्याची माहिती सूत्रांनी सांगितलं. एसआयटीकडून त्या महिला नेत्याचाही चौकशी केली जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. एसआयटीला खरातच्या कार्यालयातील अनेक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. त्यामध्ये अनेक धक्कादायक नावं समोर आली आहेत, त्या सर्वांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
खरातकडे कोट्यवधींची माया
अशोक खरातने केवळ महिलांचे लैगिक शोषण केले नाही, तर त्यांच्याकडून मोठया प्रमाणात पैसेही उकळले. त्यातून त्याने कोट्यवधींची माया जमवली आहे. म्हणून आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्याकडे मोर्चा वळवला आहे. त्याने कोट्यवधींची माया कशी जमवली याची कसून चौकशी केली जात आहे.










