Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • भाजपा नेत्याच्या मुलाकडून 30 मुलींचं शोषण, सेक्स स्कँडलनं गोवा हादरलं
Top News

भाजपा नेत्याच्या मुलाकडून 30 मुलींचं शोषण, सेक्स स्कँडलनं गोवा हादरलं

Sexual Exploitation of 30 Minor Girls

Goa sex scandal BJP leader son : निसर्गरम्य पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा राज्यातून एक अत्यंत विदारक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. दक्षिण गोव्यातील कुडचडे भागातील एका भाजप नगरसेवकाच्या २० वर्षीय मुलाने तब्बल ३० अल्पवयीन मुलींना (30 underage girls) आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण (sexual abuse) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे, तर संपूर्ण गोव्यात खळबळ (Sensation in Goa) उडाली आहे. संशयित आरोपी सोहम नाईक (Accused Soham Naik) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, हे प्रकरण आता तपासासाठी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे.

हेही वाचा – अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने जवळीक साधली, गुंगीचं औषध दिलं अन्…; वसईतील भोंदूबाबाचा पुण्यातील महिलेवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केले

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सोहम नाईक याने मागील काही काळापासून परिसरातील अनेक अल्पवयीन मुलींशी सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष भेटीगाठींच्या माध्यमातून मैत्री केली होती. त्याने या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केले. धक्कादायक बाब म्हणजे, त्याने या अत्याचाराचे चित्रीकरण केले होते. हे अश्लील व्हिडिओ त्याने आपल्या काही मित्रांना पाठवले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो पीडित मुलींना ब्लॅकमेल करत होता.

मुलींनी धाडस करून पालकांची पोलिसांत धाव

हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा काही पीडित मुलींनी धाडस करून आपल्या पालकांना या त्रासाबाबत सांगितले. यानंतर पालकांनी पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात ही संख्या ३० च्या आसपास असल्याचे समोर आल्याने पोलिसांचेही धाबे दणाणले आहेत.

तपास ‘क्राईम ब्रँच’कडे सोपवण्याचे आदेश

प्रकरणाचे गांभीर्य आणि पीडितांची मोठी संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाचा तपास तातडीने स्थानिक पोलिसांकडून काढून ‘क्राईम ब्रँच’कडे सोपवण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने गुरुवारी कुडचडे येथील सोहम नाईकच्या घरावर छापा टाकला. या झडतीदरम्यान पोलिसांनी डिजिटल पुरावे, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर संशयास्पद दस्तऐवज हस्तगत केले आहेत.

३० पैकी ४ मुलींची ओळख पटवण्यात यश

राज्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले की, “या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. आतापर्यंत ३० पैकी ४ मुलींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून त्यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पीडित मुलींची गोपनीयता आणि सुरक्षितता जपण्यासाठी आम्ही सर्व खबरदारी घेत आहोत.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts