Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?
महाराष्ट्र

राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?

shinde-pawar

Sharad Pawar’s MPs in contact with Eknath Shinde? : शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्धे खासदार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत. शरद पवारांच्या अर्ध्या खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा: धक्कादायक..! विमानाने प्रवास करताय तर पुढचा धोका ओळखा..! ५० टक्के व्यावसायिक विमानांमध्ये तांत्रिक त्रुटी

शिंदेंच्या संपर्कातील खासदार मराठवाडा व विदर्भातील

दरम्यान, जे खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, ते मराठवाडा व विदर्भातील आहेत. हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो.

८ जागांवर विजय

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ८ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांनी १० जागा लढवल्या होत्या. तर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत १५ जागा लढवल्या, परंतु त्यांना ७ जागांवर यश मिळाले. आता जर का शरद पवार गटाचे अर्धे खासदार शिंदे यांना मिळाल्यास त्यांचे लोकसभेतील संख्याबळ ११ होऊ शकते.

२०२२ मध्ये शिंदे यांची शिवसेनेत बंडखोरी

२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले होते. परंतु २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्यासकट ४० आमदार गुवाहाटीला गेले होते. शिवसेनेचे अनेक खासदारही त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी लागली.

अजित पवार यांच्या बंडखोरीने राष्ट्रवादीतही झाली होती उलथापालथ

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली. अजित पवार यांच्यासोबतही त्यांच्यासकट ४० आमदार शरद पवार यांना सोडून बाहेर पडले. त्यामुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले. अजित पवार गटाने भाजपाशी सलगी केली. एवढेच नाही तर ते राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले. दरम्यान, आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता आहे. कारण शरद पवार गटाचे अर्धे खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts