• Home
  • Top News
  • कोट्यवधींचा ऑर्डर मिळूनही L&T शेअर्समध्ये मोठी घसरण; जाणून घ्या नेमकं कारण काय?
Top News

कोट्यवधींचा ऑर्डर मिळूनही L&T शेअर्समध्ये मोठी घसरण; जाणून घ्या नेमकं कारण काय?

share market

Larsen & Toubro shares fall: 2500 कोटीं रुपयांचे मोठे ऑर्डर्स मिळूनही लार्सन अँड टुब्रो (L&T) च्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सकारात्मक बातमी असूनही शेअर का घसरले, यामागे जागतिक घडामोडी आणि बाजारातील बदलते संकेत कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आता या घसरणीमागील नेमकी कारणे काय आहेत, ते जाणून घेऊया.

शुक्रवारी लार्सन अँड टुब्रो (L&T) या आघाडीच्या अभियांत्रिकी आणि बांधकाम कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे ३ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. विशेष म्हणजे, कंपनीला सुमारे २५०० कोटी रुपयांचे मोठे देशांतर्गत प्रोजेक्ट्स मिळूनही बाजारात सकारात्मक प्रतिसाद दिसला नाही.

 

कंपनीच्या ‘बिल्डिंग्स अँड फॅक्टरीज’ विभागाने विविध राज्यांमध्ये महत्वाचे प्रोजेक्ट्स मिळवले आहेत. गुजरातमध्ये ग्लास उत्पादन प्रकल्प उभारणी, आंध्र प्रदेशमध्ये अत्याधुनिक दुचाकी उत्पादन युनिट आणि आसाममध्ये गुवाहाटी येथे मोठ्या प्रमाणावर जलव्यवस्थापन प्रकल्पाचा समावेश आहे.

तरीही शेअर्समध्ये घसरण होण्यामागे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी. पश्चिम आशियात वाढलेल्या तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. या प्रदेशातील परिस्थितीमुळे मोठ्या प्रोजेक्ट्सच्या अंलबजावणीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एल आणि टी चा मोठा व्यवसाय मिडल ईस्टमध्ये असल्याने तेथील कोणतीही अस्थिरता कंपनीच्या उत्पन्नावर आणि नफ्यावर परिणाम करू शकते. याशिवाय, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे प्रकल्पांचा खर्च वाढवण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रावर होऊ शकतो. एकूणच, जागतिक अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांची सावध भूमिका यामुळेच सकारात्मक बातमी असूनही L&T च्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts