Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • भोंदूबाबा अशोक खरातचा खेळ संपला; ऑफिसमध्ये सापडल्या धक्कादायक वस्तू, आज कोर्टात होणार निर्णायक सुनावणी
Top News

भोंदूबाबा अशोक खरातचा खेळ संपला; ऑफिसमध्ये सापडल्या धक्कादायक वस्तू, आज कोर्टात होणार निर्णायक सुनावणी

Ashok Kharat Case | नाशिक (Nashik) जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. अशोक खरातने अनेक महिलांची फसवणूक करत, त्यांच्या अंधश्रेद्धेचा फायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच अशोक खरातने महिलांसोबतच काही पुरूषांची आर्थिक फसवणूक केल्याचंही समोर आलं आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अशोक खरातला बेड्या ठोकल्या आहेत. तर या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकाकडून (SIT) केला जात आहे. या तपासात आता धक्कादायक खुलासा झाला आहे.

हेही वाचा – वसतीगृह प्रशासनाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खेळ, अंबडमध्ये जेवनात अळ्या, किडे अन् उंदराच्या लेंड्या

अशोक खरातच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ होणार?

अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपत आहे. त्यामुळे आज एसआयटी त्याला दुपारी न्यायालयात हजर करणार आहे. तर एसआयटी तपासादरम्यान समोर आलेले काही धक्कादायक पुरावे सादर करणार असून अशोक खरातच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशोक खरातच्या कार्यालयात सापडल्या धक्कादायक वस्तू

पोलिसांनी नराधम अशोक खरातचे कार्यालय सील केले होते. तर मागील तीन दिवसांपासून हे कार्यालय उघडून तब्बल चार वेळा पंचनामा करण्यात आला आहे. या तपासात पोलिसांना आक्षेपार्ह वस्तू, पीडित महिलांशी संबंधित महत्त्वाचे पुरावे आणि जादूटोण्याचे साहित्य पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळत आहे. तसेच एसआयटीकडून अशोक खरातची कसून चौकशी करण्यात आली असून या चौकशीत त्याने दिलेली माहिती आणि त्याच्या कार्यालयात मिळाले पुरावे याची सांगड घालत पोलिसांनी भक्कम दोषारोपपत्र तयार करण्याची तयार सुरू केली असून अशोक खरातच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

आत्तापर्यंत अशोक खरातवर एकूण 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 2 जणांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आणि 9 महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आज याप्रकरणी न्यायालयात सरकारी पक्षाकडून विशेष युक्तीवाद होण्याची शक्यता आहे.

एसआयटी आता या प्रकरणातील आणखी पुरावे गोळा करण्यासाठी आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मागणार आहे. तसेच अशोक खरातची वैद्यकीय तपासणी करून त्याचे अहवाल देखील न्यायालयात सादर केले जाऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोर्टात आज काय निर्णय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts