Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • “तू सुंदर आहेस, पण तुझा नवरा…”, अशोक खरात महिलांना कसं ओढत होता आपल्या जाळ्यात? झाला धक्कादायक खुलासा
Top News

“तू सुंदर आहेस, पण तुझा नवरा…”, अशोक खरात महिलांना कसं ओढत होता आपल्या जाळ्यात? झाला धक्कादायक खुलासा

Ashok Kharat Case | नाशिकमधील (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. अशोक खरातने अनेक महिलांची फसवणूक करत त्यांचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातने विवाहित महिला, तरूणी यांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. तर आता अशोक खरातला नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अटक केली असून या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – तणाव वाढला! अमेरिकेचे F-16 लढाऊ विमान इराणने पाडले; IRGCचा खळबळजनक दावा

सध्या अशोक खरात प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (SIT) करत आहे. एसआयटीने महिलांसाठी एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. तर या नंबरवर फोन करत अनेक महिलांनी अशोक खरातविरोधात तक्रार दाखल करत आपल्यावर कशाप्रकारे त्याने अत्याचार केला याबाबतची माहिती दिली आहे. मात्र, या महिला जरी फोनवरून खरातविरोधात तक्रार दाखल करत असल्या तरी त्या प्रत्यक्षात पुढे येऊन तक्रार देण्यास मनाई करत आहेत.

आत्तापर्यंत अशोक खरातविरोधात एकूण 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. खरातवर आणखीही गुन्हे दाखल होऊ शकतात मात्र समाजाच्या भितीने महिला पुढे येत नाहीयेत. तसेच अशोक खरातचे त्याच्या कार्यालयातील काही धक्कादायक व्हिडीओ देखील समोर आले आहेत. या व्हिडीओने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तर हे व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे.

अशोक खरात महिलांना कसं ओढत होता आपल्या जाळ्यात?

अशोक खरातने अनेक महिलांवर, तरूणींवर अत्याचार केला आहे. मात्र, अशोक खरातच्या जाळ्यात महिला कशा अडकत होत्या? याबाबतची माहिती देखील आता समोर आली आहे. महिला आपल्या घरगुती, वैयक्तिक आयुष्याबाबतच्या समस्या घेऊन खरातकडे जात होत्या. तेव्हा ढोंगी खरात महिलांना गोड बोलत त्यांचा विश्वास जिंकत त्यांच्याशी जवळीक साधत त्यांचा गैरफायदा घेत होता.

तो महिलांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत होता. तू खूप जास्त सुंदर आहेस पण तुझा नवरा तुला समजून घेत नाही. तो तुझी कदर करत नाही, असं म्हणत तो महिलांचा विश्वास जिंकत होता आणि आपल्या जाळ्यात त्यांना अडकवत होता. तसेच तो महिलांना विविध उपाय सांगून त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत होता आणि त्यांचे लैंगिक शोषण करून त्यांची फसवणूक करत होता. भोंदू खरातच्या या गोड बोलण्याने अनेक महिला फसत होत्या.

दरम्यान, आज भोंदूबाबा अशोक खरातला कोर्टात हजर केले जाणार आहे. अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपत आहे. त्यामुळे आज एसआयटी त्याला दुपारी न्यायालयात हजर करणार आहे. तर एसआयटी तपासादरम्यान समोर आलेले काही धक्कादायक पुरावे सादर करणार असून अशोक खरातच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts