Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • तणाव वाढला! अमेरिकेचे F-16 लढाऊ विमान इराणने पाडले; IRGCचा खळबळजनक दावा
Top News

तणाव वाढला! अमेरिकेचे F-16 लढाऊ विमान इराणने पाडले; IRGCचा खळबळजनक दावा

us 1

US-Iran War | सध्या अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमधील तणाव चांगला वाढला आहे. या तिन्ही देशांमधील युद्ध (War) आणखी पेटत चालले आहे. एकिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पाच दिवस युद्धबंदीची घोषणा केली होती. तर दुसरीकडे इराणने आमच्या अटी पूर्ण केल्याशिवाय हे युद्ध थांबणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे हे युद्ध आणखीनच पेटत चाललं आहे. अशातच आता इराणने मोठा दावा केला आहे.

हेही वाचा – उद्योगजगतातील दिग्गज हरपले; रेमंड ब्रँडचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचं निधन

अमेरिकेच्या एफ-16 लढाऊ विमानाबाबत इराणने काय केला दावा?

इराणने अमेरिकेचे एफ-16 हे लढाऊ विमान लक्ष्य करत ते पाडले असल्याचा मोठा दावा केला आहे. याबाबतची माहिती इराणच्या निमलष्करी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने दिली आहे. IRGC ने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या लष्कराने अमेरिकेचे एफ-16 लढाऊ विमान आणि एक एमक्यू-9 ड्रोन पाडले आहे.

IRGC ने केलेल्या दाव्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. आयआरजीसीने दावा केला आहे की, त्यांनी दक्षिण इराणमधील शिराझ शहरावरून उडणारा एक अमेरिकन MQ-9 ड्रोन यशस्वीरित्या पाडला आहे. तसेच अमेरिकेच्या F-16 लढाऊ विमानावर हल्ला देखील केला असल्याचा दावाही आयआरजीसीने केला आहे. तर या घटनेबाबत अद्याप अमेरिकेने कोणतेही निवेदन जारी केलेले नाहीये.

इराणने अमेरिकेसह इस्त्रायललाही केले टार्गेट

इराणच्या तसनीम वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या औद्योगिक आणि नागरिक स्थळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच इराणने व्याप्त प्रदेशांमधील अमेरिकेच्या आणि इस्त्रायलच्या तळांनाही टार्गेट केले आहे.

दरम्यान, अमेरिकेने इराणला होर्मुझ खाडी खुली करण्याकरिता 48 तासांचा वेळ दिला होता. मात्र, यानंतर इराणने अमेरिकेला धमकी दिली होती. जर अशा धमक्या देत असाल तर होर्मुझ खाजी पूर्णच बंद करू, अशी थेट धमकी इराणने अमेरिकेला दिली होती. यानंतर अमेरिकेने 5 दिवसांची युद्धबंदी जाहीर केली आहे. यानंतरसुद्धा इराणने पुन्हा एकदा अमेरिकेला मोठा इशारा दिला आहे. जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत हे युद्ध बंद होणार नाही, असा थेट इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे. त्यामुळे आता अमेरिकेच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे.

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण या देशांमधील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. या तिन्ही देशांमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण अद्यापही हे तिन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करताना दिसत आहे. त्यामुळे हा संघर्ष कधी संपणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts