Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • साधूच्या वेशात रस्त्यावर महिलांना नको तिथे स्पर्श; VIDEO पाहून थक्क व्हाल
Top News

साधूच्या वेशात रस्त्यावर महिलांना नको तिथे स्पर्श; VIDEO पाहून थक्क व्हाल

viral video

Viral Video Sparks Outrage on Social Media: सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती साधूच्या वैशात रस्त्यावरील मुलींना स्पर्श करताना दिसत आहे. नेमका काय प्रकार आहे. चला जाणून घेउयात

साधूच्या वेशात रस्त्यावर जाणाऱ्या महिलांवर अनैतिक कृत्य करणाऱ्या ढोंगी बाबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे सार्वजानिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.

हेही वाचा: हाडांमध्ये वेदना आणि सतत कटकट आवाज येतोय? मग ‘या’ 5 मेडिकल टेस्ट नक्की करा

माहितीनुसार, हा ढोंगी साधू राजस्थानमधील जामडोली गावचा रहिवासी असून त्याचे नाव नारायण दास आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ हिमाचल प्रदेशातील शिमला शहरातील गर्दीच्या रस्त्यावरचा आहे.

व्हिडिओत दिसते की, साधूच्या वेशातील हा आरोपी गर्दीचा फायदा घेऊन महिलांना नको तिथे स्पर्श करत आहे. परिसरात चालणाऱ्या एक व्यक्तीने हा प्रकार कॅमेऱ्यात टिपला, जो नंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरला.

https://x.com/Brand_Anuj/status/2037436982868271321?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2037436982868271321%7Ctwgr%5E706359005b34898723ca89613c67193cdcd6ea66%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fviral-videos%2Fviral-video-fake-god-man-sadhu-baba-misconduct-harassment-assault-abusing-with-women-in-shimla-mall-road-video-goes-viral-latest-marathi-news-aak2003

घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला अटक केली. पोलिसांनी व्हिडीओ आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारावर कारवाई केली असल्याची माहिती दिली आहे. आता शहरातील गर्दीच्या परिसरात अशा इतर तक्रारी आहेत का, याचीही तपासणी सुरू आहे.

या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तशीच सार्वजनिक ठिकाणी सावधगिरी बाळगणे आणि संशयास्पद व्यक्तींविषयी तत्काळ पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे.

 

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts