Stock Market Schedule: एनएसई (NSE) आणि बीएसई (BSE) या दोन्ही एक्सचेंजनी ट्रेडिंगचे वेळापत्रक सारखेच ठेवले आहे, त्यामुळे आज इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज किंवा इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्समध्ये टेंडिंग होणार नाही.
महावीर जयंतीनिमित्त आज, ३१ मार्च रोजी भारतीय शेअर बाजार बंद आहे. हा दिवस जैन धर्मातील एक महत्वाचे आध्यात्मिक नेते भगवान महावीर यांच्या जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. आज, शेअर बाजार बंद असल्याने, एनएसई (NSE) आणि बीएसई (BSE) या दोन्हीवर इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज आणि सिक्युरिटीज लेंडिंग यांसारख्या विभागांमध्ये ट्रेडिंग होणार नाही.
हेही वाचा: मनीषा कोईरालानं स्वीकारला 55 वर्षांत ‘सॉल्ट-अँड-पेपर’ लूक
कमोडिटी मार्केटचे (MCX) सकाळचे सत्र बंद राहील, परंतु सत्र सायंकाळी ५ वाजता सुरू होईल. ही आठवड्याची पहिली सुट्टी असून, शुक्रवारी गुड फ्रायडे आणि शनिवार- रविवार असे पुढील ३ दिवस सुट्टी राहणार आहे. एकाच आठवड्यात दोन सुट्ट्या असल्यामुळे ट्रेडिंगचे दिवस कमी झाले आहेत. दोन्ही एक्सचेंजनी त्यांचे ट्रेडिंग वेळापत्रक सारखेच ठेवल्यामुळे, आज इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह, करन्सी डेरिव्हेटिव्ह किंवा इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्समध्ये ट्रेडिंग होणार नाही. किरकोळ गुंतवणूकदार आणि ट्रेडर्ससाठी, याचा अर्थ असा आहे की आजच्या सत्रात शेअर बाजारातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहतील.
बाजारपेठ उद्या सुरू असेल का?
बुधवार, १ एप्रिलपासून व्यवहार पुन्हा सुरू होतील. उद्या नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) सुरू होत आहे. अशा परिस्थितीत, शेअर्सची खरेदी-विक्री नेहमीप्रमाणे सुरू राहील. मात्र वार्षिक बँक सुट्टीमुळे किंवा सेटलमेंट हॉलिडे’ म्हणून घोषित केलेल्या दिवसामुळे निर्बंध घालण्यात आले आहेत.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, त्या दिवशी व्यवहार होणार असले तरी, खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात पैसे आणि शेअर्सचे प्रत्यक्ष व्यवहार त्या दिवशी होणार नाहीत. त्याऐवजी, सेटलमेंट पुढील कामकाजाच्या दिवसापर्यंत पुढे ढकलली जाईल.












