Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुण्यात भोंदू प्रकरण, ‘अंगातील दोष दूर करण्यासाठी शारीरिक संबंध ठेव’; महिलेवर अत्याचार
Pune

पुण्यात भोंदू प्रकरण, ‘अंगातील दोष दूर करण्यासाठी शारीरिक संबंध ठेव’; महिलेवर अत्याचार

Pune fake baba sexual assault case

Pune fake baba sexual assault case : नाशिकमधील कॅप्टन फाईल्स उघडल्या (Captain Kharat Files) आणि देश हादरून गेला, आध्यात्माच्या नावाखाली खरातनं जी रासलीला आणि महिलांच्या शोषणाची (Exploitation of Women) मालिका चालवली होती ती बाहेर आली. त्यानंतर खरातच्या मुसक्या आवळल्या आणि त्याचा मुक्काम आता जेलमध्ये आहे, हे प्रकरण देशभरात सोशल मीडियापासून मेनस्ट्रीम मीडियापर्यंत धुमाकूळ घालत असताना आता पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोलीतून येथून आणखी एक  (Shocking Incident) समोर आला आहे.

अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण (Assault on a Woman) करणाऱ्या एका भोंदू बाबाचा खरा चेहरा आता चव्हाट्यावर आला आहे. शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी नावाच्या या भोंदूने महिलांच्या अगतिकतेचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे समोर येत आहे. पुणे ग्रामीणमधील खेड तालुका सध्या एका भयंकर कृत्याने हादरला आहे. चांडोली येथील शिवदत्त आश्रमात ‘महाराज’ म्हणून मिरवणारा नवनाथ गवळी हा प्रत्यक्षात वासनांध भोंदू असल्याचे उघड झाले आहे. एका ३४ वर्षीय महिलेने या गवळीबाबा विरुद्ध धारिष्ट्य दाखवून खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा – खरातच्या फोनमधून मोठा खुलासा; महिलांसाठी खास नंबर तर नेत्यांसाठी…, खळबळजनक माहिती समोर

अंगातील दोष दूर करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील

मिळालेल्या माहितीनुसार, ​मे २०२५ पासून पीडित महिला कुटुंबासह आश्रमात दर्शनासाठी जात होती. १७ जुलै २०२५ रोजी पहाटे जप करत असताना आरोपीने महिलेचा विनयभंग केला. “तुझ्या अंगातील दोष दूर करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील,” अशी अश्लील मागणी आरोपीने केली.

महिलेकडून लैंगिक अत्याचार झाल्याची कबुली

धक्कादायक बाब म्हणजे, सुरुवातीला केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असला, तरी प्रत्यक्षात आपल्यावर अत्याचार झाल्याची कबुली आता पीडितेने दिली आहे. कुटुंबाची भीती आणि सामाजिक प्रतिष्ठेपोटी महिलेने सुरुवातीला पूर्ण सत्य लपवले होते. मात्र, आरोपीकडून होणारा फोनवरचा त्रास आणि ‘खरात’ प्रकरणामुळे मिळालेल्या प्रेरणेतून या महिलेने आता सर्व सत्य समाजासमोर मांडले आहे.

महिलांमध्ये वेगळी शक्ती असल्याचे भासवून, त्यांच्या मनावर ताबा

“आम्ही देवाच्या श्रद्धेने तिथे गेलो होतो, पण या माणसाने अंधश्रद्धेचा बाजार मांडला आहे. अंगात येण्याचे थोतांड रचून तो महिलांचे शोषण करतो. आमच्या कुटुंबाला आता भीती वाटतेय.” तपासात असेही समोर आले आहे की, या आश्रमात महिलांच्या ‘अंगात येण्याचे’ प्रकार घडवून आणले जातात. महिलांमध्ये कोणती तरी वेगळी शक्ती असल्याचे भासवून, त्यांच्या मनावर ताबा मिळवला जातो आणि मग ‘दोष निवारण’ करण्याच्या नावाखाली नवनाथ गवळी त्यांचे शोषण करतो.

गुन्हा दाखल करूनही आरोपी अद्याप मोकाट

खेड पोलिसांनी गुन्हा दाखल करूनही आरोपी नवनाथ गवळी अद्याप मोकाट. न्यायालयात प्रकरण असूनही आरोपी एकाही तारखेला हजर राहत नसल्याचे निष्पन्न. आरोपीच्या दहशतीमुळे पीडितेचे कुटुंब सध्या प्रचंड दडपणाखाली आहे. एककीडे प्रशासन अंधश्रद्धा निर्मूलनाचे दावे करत असताना, दुसरीकडे पुण्याच्या ग्रामीण भागात अशा प्रकारे महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे. गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक का होत नाही? हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे. धर्माच्या नावाखाली चालणारा हा क्रूर खेळ थांबण्याची गरज आहे. खेड पोलिसांनी या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन इतरही पीडित महिलांना समोर येण्याचे आवाहन केले पाहिजे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts